शनिवार, ७ मे, २०१६

अस असाव स्मार्ट काॅलेज

काॅलेज हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा अन् आपुलकीचा विषय असतो.काॅलेजमधील दिवस आणि कॉलेजात केलेली मस्ती प्रत्येकाच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देतं; परंतु या सगळ्याबरोबरच सध्याच काॅलेज एकंदर शिक्षण पद्धती पहाता कुठेतरी व्यावसायाच्या करियरच्या ठिकाणी आपण कमी पडतो आणि मग असं नकळतं किंवा असे उद्गार येतात,अरेरे! काॅलेजमध्ये करायला हवं होत अरे हे शिकवलच नाही!
        मुळात आपण कितीही म्हटलं की आपल्या आयुष्याचा पाया शाळेत घातला जातो,त्यापेक्षा अधिक पट तो काॅलेजमध्ये होत असतो.आपल्या कलागुणांना कुशलतेला योग्य आणि मुक्त व्यासपीठ काॅलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर मिळतं: परंतु असं म्हणतात की हिरा घडवण्यासाठी त्याला आधी पैलू पाडावे लागतात ते काम कळत नकळत काॅलेजमध्ये होत असतं आणि असं कुशल ज्ञानरूपी हिरे तयार करण्यासाठी स्मार्ट काॅलेज अगदी योग्य आहे अस मला वाटतं.
     स्मार्ट काॅलेज म्हणजे नुसत इन्फास्ट्रकचर स्मार्ट चकचकीत केलम असं नाही तर विद्यार्थ्यांच्या कलेला आणि ज्ञानाला योग्य ती संधी योग्य मार्गदर्शन आणि योग्य व्यासपीठ असा त्रिवेणी संगम मिळावा. या बरोबरच व्यावहारिक तात्विक आणि चौकटी पलिकडचा विचार तरण्याची क्षमता आणि बुद्धीमत्ता वाढीस लागण्यासाठी विविध उपक्रमांचे अथवा कार्यक्रमांचे आयोजन करावे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कार्यशाळा कार्यक्रम करावेत.याच जोडीला प्रत्येक परीक्षांनंतर त्या त्या डिपार्टमेंट अथवा संबंधीत शाखांशी प्राचार्यांनी संवाद साधावा व यात विद्यार्थांना चांगल्या वाटचालीसाठी आणि प्रगतीसाठी शुभेच्छा द्याव्यात.
या शिवाय काॅलेजमध्ये कॅंपस मुलाखती online exam e-learning यांची सोय असावी.
विद्यार्थांना तंत्रज्ञानाचा आणि छापिल पुस्तकाचा अभ्यास दोन्ही असावा. या व्यतीरिक्त presentation projects हे soft copy वर असावेत. प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र संगणक कक्ष किमान ३ संगणक आणि स्वतंत्र छोटे पुस्तक संग्रह असावं. आठवड्यातला एक दिवस विद्यार्थांसाठी वाचन कट्टा अथवा talk show  चर्चासत्र असावे, यासाठी स्वतंत्र खोली असावी.
        Admission पासून रिझल्ट पर्यत ची व्यवस्था ही ऑनलाईन पद्धतीची असावी, त्याच प्रमाणे तृतीय वर्षातील विद्यार्थांनसाठी काही काऊंसिल कार्यशाळा असाव्यात, ज्यामध्ये त्यांच्या भवितव्याबद्दल आणि पुढील आयुष्याच्या एकंदर वाटचालीसाठी तसेच अभ्यासाला पुरक असे मार्गदर्शन असावे. याच बरोबर विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदैव ऋणी आहेत.त्यांनी काॅलेजमधील प्रत्येक अगदी वर्ग लाईट फळा इथपासून ते शिकक्षकांपर्यंत सर्वांचा योग्य आदर आणि योग्य तो उपयोग केला पाहिजे. काॅलेजने ज्या ज्या संधी दिल्या त्याचा योग्य आणि पुरेपूर फायदा विद्यार्थांनी करून घेतला पाहिजे. स्मार्ट काॅलेज तेव्हाच होईल जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांचे संबंध हे सलोख्याचे आणि आदराचे असतील यासाठी दोन्ही बाजून प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. तरच आपलं कॉलेज स्मार्ट कॉलेज होईल यात शंकाच नाही. असं मला वाटतं.

  -क्रांती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा