गुरुवार, १२ जानेवारी, २०१७

"मन की बात !"

    आजचा दिवस तसा कंटाळवाणाच गेला. मी आणि माझी मैत्रिण माधवी माटुंग्यात माहेश्वरी उद्यानात सहज  फेरफटका मारून येऊ म्हणून जात असतानाच वाटेत आम्हाला एक मसाला पापडची गाडी लावलेली दिसली. आम्ही दोघींही एकमेकींकडे पाहात पापड घ्यायचा विचार करत होतो.तो मसाला पापड विकणारा भैयाही नुकतीच स्वत:ची गाडी लावूनं सेटलं होत असावा.अजून पर्यंत एकही गिऱ्हाईक आलं नव्हतं कदाचीत;कारण पहिला बोवनीचा पापड तसाच भाजून ठेवला होता.
भैया दो मसाला पापड देना....एक पार्सल और एक खाने के लिए...मी वेळ न दवडता पटकन सांगितल.
हा ..तो ये लो!”
भैया वो नही!” , मी
अभी तो किया है..
नही नया बनाओ ना!”
       त्याचाही धंदा होता. तोही काही न बोलता आता मसाला पापड करण्यात व्यस्त झाला. त्याच्या सोबत असणारे त्याचे काका त्याला मदत करत होते. खूप वयस्कर नसावा तो मुलगा! आमच्या पेक्षा २ वर्षांनी मोठा असेल कदाचीत; पण बोलणं वागणं खूप आदबीच होतं. आम्ही उभे होतो त्या पलिकडच्या बाजूला बऱ्याच डिश पडल्या होत्या आणि त्या काकांनी त्या मुलाला उचलून कचरापेटीत टाकायला सांगितल्या. ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ सडकं’,हा सगळा प्रकार पूर्ण होईपर्यंत आम्ही पार्सल घेऊन, पैसे देऊन निघालो खरे ; पण त्यानंतर तो प्रसंग आमच्या डोक्यात घोळत होता.यावर आमच्यात सहज म्हणता म्हणता एक छान आणि वेगळीच चर्चा रंगली.
     “बघ ना! सगळीकडे स्वच्छ भारत मोहीम सुरू आहे; पण हे शेवटी त्या मुलाला का सांगावं लागलं की तो कचरा उचलून त्या कचरा पेटीत टाक...
हे तो स्वत: ही करू शकला असता ना! ,माधवी.
अगं आपण असं स्वत:हून करायची इच्छा असती तर खूप गोष्टी झाल्याच असत्या की,मी
म्हणजे? माधवीन मध्येच विचारलं
म्हणजे, आपल ना अस असतं की आपल्या मागे किंवा डोक्यावर कोणाचा तरी वचकं, दरारा लागतो,तो असला की सगळ कस निट होतं, नाहीतर बिनबोभाट असतं नाही..!
बघ ,आज स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा हे शाळेपासुन शिकवल जात! तरी आजच्या सरकारला त्यावर मोहीम करावी लागते आणि त्यावर काम कराव लागत या सारखं मोठं दूर्देव नाही. इथे फक्त स्वत:सोबत भारताला स्वच्छ ठेवा ह्या बरोबरच ना मन की बात मध्ये मनालाही स्वच्छ ठेवा ही योजना ही असायला हवी होती. मग कदाचीत बदल घडावा असं तरी वाटलं असतं सगळ्यांना.
 तिला माझ्या या निरागस बोलण्याची किवं आली की हसू, हेच मला समजायला दोन सेकंद गेले.
खरंच आहे ना आधी आपली मन आणि डोकी स्वच्छ करायला हवीत तर बाकी गोष्टी स्वच्छ होतीलं.
    शेवटी मनातली तुसडेपणाची,कुटीरतेची भावना तोकडी मनोवृत्तीची जळमट म्हणजे आपल्याला आरक्षण नको असतं फक्त बोलायला पण फायदाच असेलं तर हवं! जाता जात नाही ती जात संस्था नको आणि अंतरजिय विवाहही नकोत.स्रीयांचे प्रश्न आणि पुरुष प्रधान यावर वादविवाद करण्याआधी दोन्ही बाजूच्या चूका समजून घ्यायला नकोत.इथे लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत पण आम्हाला याची जाणीव ही नको आणि माणूसकीचे धडे देणारा माणूस हा कार्यकररता नेता नको. तर डोक्यातल्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे आणि नको त्या अस्मितांचे किडे जेव्हा स्वच्छ होतील तेव्हाच खरं त्या स्वच्छ भारतअभियानाला अधिक श्रेय द्याव लागेल.. या पेक्षा खूप वेगळे आणि गरजेचे प्रश्न आजही आहेत आपल्याकडे पण आपल्या मनावरच्या आणि डोळ्यावरच्या जळमटाच काय? प्रत्येक गोष्टीला अर्थातच हा विचार खूप आयडीयल हे माहित आहे ; आपण स्वत:हून यातलं २ टक्के जरी बदललं ना तरी खूप आहे. का माहीत आहे ! कारण आधी सवय लागायला हवी ती स्वशिस्तीची नेहमीच कोणाच्यातरी भीतीपोटी किंवा दबावाखाली कामं करणाऱ्या माणसाचं भवितव्य कधी उजळत् नाही आणि पर्यायानं देशाचही नाही. हो ना ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा