आषाढ पौर्णिमा म्हणजे
गुरूपौर्णिमा...गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस...यानिमित्तानं राज्याच्य विविध
भागांमध्ये उत्सव सुरू आहे.गुरूला आपल्या जीवनाच्या जडण
घडणीत अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जीवनाला घडवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त
करण्याचा आजचा दिवस...आई,शिक्षक,मित्रमैत्रीणी,ऑफिसचे सोबती बॉस आणि अर्थातच देव किंवा मठातील साधू हे तर प्रत्येकाच्या
आयुष्यातले गुरू असतात. पण त्या व्यतिरीक्त आपल्या आयुष्यात अशा अनेक
छोट्या-छोट्या सजीव निर्जीव गोष्टी आहेत ज्या कळत नकळत गुरूंसारखचं आपल्याला
सातत्यानं मार्गदर्शन करत राहतात...
अनुभव हा माणसाचा सगळ्यात बलवत्तर आणि मोठा गुरू
म्हणायला हरकत नाही. अनुभवातून आपण शिकतो दुसऱ्याला शिकवतो आणि घडत जातो. पण काही
म्हणा...आपल्याला जितक्या उंचीवर हे अनुभव नेऊन ठेवतात त्या पेक्षा १० पट आपले पाय
जमिनीवर आणण्याला जबाबदार हा आपलाचं अनुभव असतो,नाही का?
निसर्ग...तुम्ही
निसर्ग नियमाच्या विरूद्ध गेलात तर निसर्गही तुम्हाला त्या पद्धतीनं त्याचं रुप
उलगडून दाखवत आणि या निसर्गाकडून ही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेतचं की
ओ...फुलाकडून प्रसन्नता,ताजेपणा,हवे
कडून भेदभाव न करण्याची दृष्टी,सागराची विशालता सामर्थ्य,रागात असणार रौद्र रूप,पक्षांची गगनभरारी आणि ऊन
सावलीच्या खेळात रंगणारी लपाछपी. या सगळ्याच गोष्टी प्रत्येक लेखकाच्या फिलॉसॉफीत
असतातचं की...आणि प्रत्यक्षातही..फक्त आपली अनुमान शक्ती आणि निरीक्षण क्षमता कमी
पडते इतकचं...हे सगळचं खूप कॉमनं आहे पण तरी...
आज गुरूपोर्णीमेच्या निमित्तनं आज मला स्वत:लाच
एक छोटसं गिफ्ट घ्यावस वाटल का माहित आहे का..? आपण
आपले सगळ्यात पहिले गुरू असतो असं मला वाटत...आरश्यासमोर एकदा स्वता: उभं राहूनं स्वता:ला आपण
मार्गदर्शन करत असतो. आपल्या मनात आंतरंगात एक स्वता:चा अस्तीव
टिकवण्यासाठी धडपड चालू असते. कुठेतरी आपणचं आपल्याला आतून सतत दिशा दाखवत असतो...मार्गदर्शन
अर्थातच घोतो आपण... पण ते जे स्वत:चं
वेगळेपण टिकवण्यासाठी आपण धडपडत असतो ना... नला असं वाटत की माझं अंतरमन हा माझा
गुरू आहे...कारण प्रत्येक अडल्या प्रसंगावर डोळे बंद करून स्वता: च्या मनाला विचारते त्या अंतरमनाचा आवाज ऐकते..मला मिळणारं उत्तर आणि
त्याचे रिझल्टल्स हे जवळपास सारखे असतात...उदा.मी एखादी गोष्ट करतेय आणि मला माहित
आहे की ज्यामुळे आज मी माझ्या यशाची पहिली पायरी चढू शकले आणि ही खरी गुरूदक्षिणा
आहे माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या गुरूंसाठी नाही का...?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा