मुंबई...
स्वांतत्र्यानंतर या मुंबईवर अनेकांनी आपला हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. मुंबई
सोन्याचं अंड देणारी मुंबई! कधी ही न थांबणारी मुंबई! मात्र इथेच जन्मलेल्या मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर
काढण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. इथे राहणाऱ्या भूमिपुत्रावर होणारा अन्याय हा
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी सर्व सामन्यांचे डोळे उघडण्या आधीच पाहिला होता. या
मराठी माणसासाठी... मराठी अस्मितेसाठी 1965मध्ये उभी राहिली ती शिवसेना.
पण मुद्दा हा एका राजकीय पक्षाचा नाही आहे... मुद्दा
आहे तो बाळासाहेबांनी ओळखलेल्या आणि लक्षात आलेल्या मराठीच्या अस्थित्वाचा आहे.
वादाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाचे मुंबईमध्ये असलेलं अस्तित्व,
पहिल्यासारखचं आहे का? प्रश्न आहे मराठीचा, मराठी माणसाचा, मराठी
अस्मितेचा. गेले कित्येत वर्षांपासून मराठी माणूस हा मुंबईमधून बाहेर फेकला गेला
आहे. जागेच्या अभावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, तर कधी येणा-या लोंढ्यांमुळे
मराठी माणूस हा बाहेरचं फेकला गेला आहे.
पण
मराठी माणूस का फेकला गेला? तर खरं येथे असणाऱ्या गिरण्या-मिल्समालकांच्या
कारस्थानावरून हथबल होऊन संप करून मराठी माणूस खचत चालेला. मोडेन पण वाकणार नाही,
ही तर सुरूवात होती. पोटा-पाण्यासाठी आणि बायका-पोरांसाठी मुंबईत राहणारा मराठी
माणूस हा आपले घरदार विकून नाईलाजाने मुंबईच्या बाहेर जात होता.
कालांतराने इथल्या जागा गुजरात्यांनी, पंजाब्यांनी, मारवाड्यांनी
बळकावल्या. मद्रासांनी हॉटेलस् काढले. तर गुजरात्यांनी शेअरबाजारात जोर धरला होता.
प्रत्येकाने आपआपले उद्धोग चालू केले. आणि मराठी माणूस त्यांच्या हाताखाली काम करू
लागला. आपल्याचं मातीतं दुसरा येऊन एखादा उद्दोग सुरू करतो आणि भूमिपूत्र त्याच्या
हाताखाली काम करतो ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते. खर तरं आपल्या मराठी
माणसाचे चुकले होते. आहे! त्याला उद्योग करता आला नाही. म्हणून तो
चाकरमानीचं राहिला.
बाळासाहेबांनी
ह्या माणसाला झोपेतून जागं केलं आणि बाळकडू नावाचे शस्त्र दिले. तरीही मला असे का
वाटे की, मराठी माणूस अजून झोपून आहे. येथील सत्ताधारी आपला कितपतं विचार करतात. ह्यांना
आपण मतदान करून जिंकूण देतो का परप्रांतीय. असो!!
आपले मराठी मुल देखील शिकले आहे. आपल्याकडे साहित्य आहे. शिक्षण आहे. आपण
पण कशात कमी नाही आहोत. आता गरज आहे ती पुन्हा उभ राहण्याची, शिक्षणाच्या जोरावर
प्रभूत्व मिळवणयाची. कोणासाठी तर... मराठी माणसासाठी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा