डायरी, टेप रेकॉर्डर, कॅमेरा अशा गोष्टींचा
समावेश या आधी पत्रकारितेत पाहायला मिळाला. मात्र या पारंपरिक प्रतिमे नजिकच्या
वर्षात अनेक बदल घडलेत. इलेट्रॉनिक मीडियामध्ये ओबी, लाईव्ह यू सारख्या गोष्टींनी
पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला समावेश करून घेतला. सध्याच्या पत्रकारितेमध्ये ‘मोबाईल’ आणि ‘ड्रोन’ने आपलं प्रभूत्व प्रस्तापित केलं असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
मुळात ड्रोन पत्रकारितेमधला ड्रोन हा आहे तरी काय? तर ड्रोन हा एक असा कॅमेरा आहे जो रिमोटच्या सहाय्यानं हवेत
उडत असतो. हे एक छोटसं गॅजेट असतं जे विमानासारखं आकाशात उडतं आणि पत्रकारितेमध्ये
महत्त्वाचे जे व्हिजुअल्स असतात. त्या व्हिजुअल्सचे एरिअल शॉटच्या म्हणजेच
उंचावरून शॉट्स घेण्याचे काम ड्रोन कॅमेरा करत असतो.
महाराष्ट्रात ड्रोनचा सर्वाधिक उपयोग हा ‘मराठा मूक मोर्चा’च्या वेळी झाला. राज्यात ठिक-ठिकाणी मराठा
आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘मराठा मकू मोर्चा’ काढण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने जमा झालेल्या लोकांचे दृश्यं
टिपण्यासाठी या ड्रोन कॅमेऱ्याचा मोलाचा वाटा होता.
सध्या तरी ड्रोनचा वापर अशाच काही प्रसंगाच्या वेळी होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून
मुंबईत काही काळासाठी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोणता उत्सव असो किंवा
अशा जागी जिथे सहज जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या आधारे व्हिजवल्स घेता येऊ
शकतात आणि आता मोबाईलद्वारे जशी पत्रकारिता होते तशीच भविष्यात ड्रोनमुळे
पत्रकारिता करता येईल.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा