सुका दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपीट अशा अनेक प्रसंगाना सामोरा जाणारा शेतकरी. आपल्या मेहनतीतून घामातून लोकांसाठी पिक पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या वाटेला नेहमी संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष का असतो? वर्षभरात कमवलेले, कर्ज काढलेले पैसे शेतीसाठी वापरूनही शेतकऱ्याच्या हाती 50 टक्केही पिक हाती लागत नाही. अशातच शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतो? त्याच्या कुटुंबाचं होत काय? एवढेचं प्रश्न आपण विचारतो.
गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यानं आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटांना तोंड दिलं. सुरु असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक भाजप सरकारच्या हात धुवून मागे लागलेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तरतूद करतं, पण कर्जमाफी करत नाही.
|| एक दिवस सर्व किंमती वस्तू घराबाहेर ठेवून पाहा ||
|| शेतकरी काय असतो समजे ||
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात सोनं पिकवत असतो. राखण करतो. स्वत:च्या काळजावर दगड ठेवून उभ्या पिकाचं रक्षण करतो. काही वेळेला गारपीट, दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतो. तर काही वेळेला हाती पिक असूनही योग्य हमी भाव न मिळाल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
शेतकऱ्याला कुटुंबं नाही का? त्याला त्याचा संसार नाही का? खरचं शेतकरी असणं गुन्हा आहे का? जर शेतकरीच संपावर गेले तर त्यांच्या अन्न धान्यांवर जगणारे. काय होईल आपलं?
नव्या जुन्याची सांगड घालून नवे फंडे, नवीन मतं आणि नवी ऊर्जा तुमच्यासोबत शेअर करण्याचा खास छोटासा प्रयत्न, तुमची साथ काय असू द्या ट्रेन्ड नव्या मतांचा नव्या नात्यांचा.
मंगळवार, २८ मार्च, २०१७
शेतकरी असणं गुन्हा आहे का?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा