नव्या जुन्याची सांगड घालून नवे फंडे, नवीन मतं आणि नवी ऊर्जा तुमच्यासोबत शेअर करण्याचा खास छोटासा प्रयत्न, तुमची साथ काय असू द्या ट्रेन्ड नव्या मतांचा नव्या नात्यांचा.
रविवार, ९ जुलै, २०१७
गुरूदक्षिणा...
शनिवार, २० मे, २०१७
संधी
"तू हुशार आहेस मेहेनती आहेस, तू करू सकतेस अगं! कुठेही नाही मिळाल आता तरी हार नको मानूस पुन्हा छान तयारी कर आणि तुला मिळेल अगं का इतक टोन्सन घेतेस !या वाक्यांनं थोडा धीर यायचा. एक दिवस असचं अचानकपणे एका दिवशी सलग काही मिनीटांच्या अंतराने तीन फोन आले.एक फोन साप्ताहिकातून एक वृत्तपत्रातून आणि एक चॅनल मधून! आता मोठा झोल होता कुठे जाऊ अस झाला होतं.साप्ताहिक आणि वृत्तपत्रात मी या पूर्वी कोणतेच काम केले नसल्याने तिथं कितपत जमेल आणि त्या वातावरणात आपण सर्वाइव करू शकू का याचा विचार करून थोडी ती संधी होल्डवर टाकली आणि चॅनलला जायच अस ठरलं.अजून 5 राऊंड बाकी होते.वृत्तपत्रचे सगळे राऊंड देऊन सिलेक्शन झाल होतं.पण चॅमलच्या प्रत्येक राऊंड नंतर एक वेगळीच भीती होती.
मात्र अचानक शेवटचा राऊंड संपल्यावर हातात लेटर मिळालं.आणि पुन्हा ती वाक्य आठवली.या आधी मी केलेल्या अभ्यासाचा आणि एंटर्नशीपच फळच असाव हे.आता मन लावून फक्त काम करायचं खूप शिकायच आणि मी माझ्या इंटरव्ह्यु मध्ये दिलेल्या उत्तराला प्रत्यक्षात साकार कारायच ही इच्छा बाळगून कामाला नव्यान सुरुवात झाली.इथले सगळेच सर आणि मॅम खूप छान समजून घेतात,शिकवतात,ओरडले तरी समजूून सांगतात.इथलं वातावरण खेळीमेळीच आहेच पण तिकतच जबाबदारीचही आहे.त्यामुळे माझी सुरूवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही.
विशेष वाटत ते एका गोष्टीच देेव देतो ते भरभरून तस मला संधी आली तेव्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं.ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे.
सोमवार, ८ मे, २०१७
बाहुबली 2
एका बाजूला राजाची कर्तव्य तत्व आणि दुसऱ्या बाजूला धर्म आणि वचनाचे पालन या दोन गोष्टीत सांभाळून आणि समजून त्या अमलात आणणे.एक उत्तम राजाचे वैशिष्ट्य कर्तव्य आणि प्रजेप्रति असणारी आस्था आदर आणि त्यांचे रक्षण करणे माता आणि मातृभूमी (अर्थात प्रजा आणि राज्य)यांचा सन्मान आणि पालन याचे उत्तम धडे देणारी राजमाता आणि तिचा पुत्र बाहुबली अशी उत्तम कथा गुंफली आहे.चित्रपटात प्रेम कथा आणि शेवटी नेहेमी हेरॉचा विजय हे ठरलेले गणित असतेच.पण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर या चित्रपटातील अनेक गोष्टी आजच्या काळाशी संलग्न होताना जणवतातच की! परायोसे ज्यादा अपनोंके घाव चुंबते है त्या type मध्ये अंतर्गत असणार राजकारण आणि त्यात जाणारा सत्याचा बळी आणि इतकं सगळं घडून शेवटी वाईट प्रवृत्तीच्या पापाचा घडा भरला की त्याचा नाश होतोच.अशी एकूणच एका वाक्यात सांगून जाणारी कथा मात्र त्यात रंगवलेली पात्र आणि सेट हा काल्पनिक असला तरी त्यातील असणाऱ्या स्वभावाच्या प्रवृत्ती या आजही पाहायला मिळतात.
या पलीकडे सिनेमॅटोग्राफी आणि ग्राफिक्स चा उत्तम वापर केला आहे.या चित्रपटात उभे केलेले सेट आणि काही दृश्या ही स्वप्नवत वाटणारी असली तरीही ती काही क्षण खरी भासून जातात मनाला भुरळ पडतात. प्रेमकथा आणि त्यात येणारे अडथळे त्यावर घेतलेला निर्णय हा किती योग्य आहे हे पटवून देणारे डायलॉग्स!
गाणी आणि संगीतही कुठेच फारसे रटाळ वाटले नाही.खर या सिनेमाचे बिग बजेट का आहे ते सिनेमा पाहिल्यानंतर जाणवते.कुठेच राटाळपणा वाटला नाही.इंटरवल पर्यंत उत्सुकता कायम राहते.बाकी चित्रपट जरूर पहा कारण कटप्पाने बहुबलीला का मारले यासाठी नाही तर एका चुकीच्या निर्णयात किती ताकद असते हे अजमावण्यासाठी.एका गैरसमजातून किती राजकारण केल जात आणि अर्थातच या बिग बजेट चा एक भाग म्हणून त्यातील स्वप्नवत सेट आणि दृश्य पाहण्यासाठी.
-क्रांती
शनिवार, १ एप्रिल, २०१७
अभ्यासाचे तंत्र
फंडा 1
SQ4R study
S -survey
Q- questions
R -read
R -react
R -remind
R -rewrite
याशिवाय
पॉकेट डिक्शनरी ज्यात आपण वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून किंवा आकृत्यांचा वापर करून उत्तर शॉर्ट मध्ये लिहून ठेवावं.उदा ट्री डायग्राम चा किंवा वेगवेगळ्या डायग्राम चा वापर करावा.या शिवाय आपण जे वाचतो त्याची नोंद कुठेतरी संदर्भासाठी करून ठेवावी.शक्य तेवढे पुन्हा पुन्हा आठवून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.फॉर्मुले किंवा समीकरण लक्षात ठेवण्यासाठी वेग वेगळी वाक्य कविता तयार कराव्यात.कोडी खेळ तयार करावेत ज्यामुळे ते सहज लक्षात राहतील.या शिवाय वर्गात शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर च्या रनिंग नोट्स काढाव्यात.या शिवाय शक्य असल्यास ग्रुप स्टडी करावा त्या मध्ये एखाद्या विषयाला धरून चर्चा केली जावी त्याच बरोबर जो विषय कळला नाही तो ग्रुप मधल्या एकां समजावून द्यावा त्यावर प्रश्न आणि उताराच्या चर्चा कराव्यात जास्त उदा वापर करून ती चर्चा मुद्याला धरून असावी त्यातील महत्वाच्या नोट्स काढाव्यात. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा केलेला भाग वाचाव व दिवसातून कमीत कमी 3 वेळा तो आठवतो का याचा प्रयत्न करावा. शक्यतो शांततेच्या वेळेत व फ्रेश असताना वाचन करावे. सकाळी किंवा एकदम रात्री आणि बाकी वेळी त्यावर विवेचन चर्चा रिमाईंड लेखन याचा वापर करावा.
सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेछा ...
गुरुवार, ३० मार्च, २०१७
ड्रोन पत्रकारिता
बुधवार, २९ मार्च, २०१७
नटापासून अभिनेत्यापर्यंत...
माझ्या एकूणच कारकिर्दीला सुरुवात ही शालेय जीवनापासून झाली.प्रेक्षकांमध्ये नुसत बसून राहण्यापेक्षा नेहेमी समोर जे चालू आहे त्या गोष्टीचा एक आपण भाग व्हावं, हि ईर्षा काही स्वस्त बसू देईना आणि मग राज्यनाट्य स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा तिथून जी सुरुवात झाली ती अगदी महाविद्यालायपासून ते आतापर्यंत.मला सुरुवातीला कॅरेमऱ्याची खूप आवड होती आणि त्यातही नवीन काहीतरी करायची मग मी वेग वेगळे शो करायचो. कॅमेऱ्यातील सगळं तंत्र शिकून घेतलं,पण नंतर काही कारणाने या सगळ्या माझ्या क्रिएटीव्हीटीवर पाणी पसरलं.त्याला काही पर्सनल कारणही तिकीच जबाबदार होती.पण मला याच क्षेत्रात स्वतःच एक स्थान निर्माण करायचा होत आणि त्या जोडीला पोटापाण्यासाठी पैसे कामावनाही गरजेचं होतं.घरच्यांची म्हणावी तितकी साथ नसल्यानं आता पुढची वाटचाल एकट्यानं कारण भाग होत.पुढे मला दिलीपच्या ओळखीने एका नाटकासाठी छोटा रोल मिळाला. तो रोल छोटा होत्या त्यापेक्षा जास्त त्या नाटकात मला विक्रम गोखलेंसोबत काम करायला मिळणार याचा आनंद जास्त होता.त्या एका नातकातच आमची ओळख खूप चांगली झाली आणि त्या नंतरची बरीच नाटके हि मला त्यांच्यासोबत करायला मिळाली हे माझं भाग्य होतं.मी सिरीयल केल्या चित्रपट केले पण आजही मला ती अभिजात नाटक जास्त भावतात आवडतात, त्यात जास्त काम करायला आवडत.कसा असत ना तुम्ही सिनेमा करा किंवा सेरीयल आपण त्या चॅनेल च्या हातातले भावले असतो पण नटाला मात्र नाटकातील पात्रच आणि कथेला अनुसरून अभिनय करण्याची मुभा असते.तुम्ही खूप पात्र जगता फुलवता आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच एक वेगळे पण निर्माण करता.याच उदा द्यायचं तर विक्रम गोखलेंच बॅरीस्टर नाटक त्यात त्यांनी जी भूमिका रंगवलीय ती आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते.
एकूणच साध्याच एकंदर हे पाहता सगळंच कुठेतरी मागे पडतंय असं वाटत आहे.आजही माझ्या घरी TV नाही कारण आज आपल्याला विचार करायलाच नको आहे,फक्त त्या खोक्या समोर बसून स्वतःच मनोरंजन करायचं बिनबोभाट ; त्या पलीकडे आज मुलांना वाचायला आवडत नाही. चांगल्या गोष्टी या तेवढ्या पुरत्याच राहतात, खर तर मला तुमच्यासारख्या नव तरुणांशी मैत्री करायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं त्यांच्यात काहीतरी करण्याची धमक असते ताकद असते ऊर्जा असते आणि तीच मलाही मिळत असते.फक्त दुःख याच वाट की त्यांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात माहिती नुसती नको असते वाचन नको असत पण तेच विझुवल गोष्टी खूप पटकन एक्ससेप्ट करता.याला कारण ही जनरेशम गॅपच आहे. पण तितकीच उत्तम विचार आणि नवनिर्मितीची ताकद आहे.फक्त याला चांगल्या वाचनाची योग्य जोड द्यावी आणि जास्त आव्हानात्मकपणे सद्याच्या गोष्टी मांडल्या जाव्यात; त्याची सुरुवात झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.
शब्दांकन - क्रांती कानेटकर
भर उन्हात काम...मगार
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...
प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.
बाळकडू
मंगळवार, २८ मार्च, २०१७
शेतकरी असणं गुन्हा आहे का?
सुका दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपीट अशा अनेक प्रसंगाना सामोरा जाणारा शेतकरी. आपल्या मेहनतीतून घामातून लोकांसाठी पिक पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या वाटेला नेहमी संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष का असतो? वर्षभरात कमवलेले, कर्ज काढलेले पैसे शेतीसाठी वापरूनही शेतकऱ्याच्या हाती 50 टक्केही पिक हाती लागत नाही. अशातच शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतो? त्याच्या कुटुंबाचं होत काय? एवढेचं प्रश्न आपण विचारतो.
गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यानं आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटांना तोंड दिलं. सुरु असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक भाजप सरकारच्या हात धुवून मागे लागलेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तरतूद करतं, पण कर्जमाफी करत नाही.
|| एक दिवस सर्व किंमती वस्तू घराबाहेर ठेवून पाहा ||
|| शेतकरी काय असतो समजे ||
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात सोनं पिकवत असतो. राखण करतो. स्वत:च्या काळजावर दगड ठेवून उभ्या पिकाचं रक्षण करतो. काही वेळेला गारपीट, दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतो. तर काही वेळेला हाती पिक असूनही योग्य हमी भाव न मिळाल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
शेतकऱ्याला कुटुंबं नाही का? त्याला त्याचा संसार नाही का? खरचं शेतकरी असणं गुन्हा आहे का? जर शेतकरीच संपावर गेले तर त्यांच्या अन्न धान्यांवर जगणारे. काय होईल आपलं?
शनिवार, ११ मार्च, २०१७
छंदोत्सव.
रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७
स्वल्पविराम
कॉलेज ची बेल वाजली नुकताच कॉलेज सुटल होत.माझा काही आज वर्गात लक्ष लागत नव्हतं. मला राधाने हलवलं. मी एकदम दचकले आणि तीने माझ्याकडे बघितलं.सगळीकडे शांतता पसरली,पण क्षणभरच...
काय ग कुठे हरवलीस ?
काय बोलावे हे न सुचल्याने मी गडबडले जणू सगळे शब्दच नाष्ट झाल्यासारखे.आज कॉलेजचा तिसरा दिवस,आम्ही आमचा सगळा ग्रुप एकत्र भेटायचं ठरवलं होतं. ग्रुप तास शाळेतलाच हो, पण परीक्षा संपल्यानंतर सगळे जण सुट्टीसाठी आपल्या गावी गेले. मग फारस भेटन झाल नाही.तसे ग्रुपमधले सगळे हुशार पण तितकेच मस्तीखोर आणि उत्साही, जीवाला जीव देणारे.शाळेत सगळ्यांचा लाडका असणारा ग्रुप होता.कोणताही काम असो किंवा अभ्यासाच्याच्या बाबतीत असो कायम पहिलं नाव घ्यायचे ते आमच्याच ग्रुपचं, हे आमच्या ग्रुपचा एक वैशिष्ट्य होत म्हणा ना ; पण आता मात्र आम्ही वेगवेळग्या शाखांमध्ये शिकायला होतो. जरी वेगळे असलो तरी मनं मात्र एक होत.माझ्या मनात अनेक विचार अजूनही घोंगावत होते आणि त्याच संभ्रमित आवस्थेत आम्ही वर्गाच्या बाहेर पडलो.
"ए हाय...!कशी आहेस?"
"ओ मॅडम कुठे हरवलाय लक्ष कुठे आहे तुमचं?"
पारस एकदम समोर आला आणि त्याने टिचकी वाजवली.
हा पारस म्हणजे एकदम मस्तीखोर! पण तो असा जरी असला तरी मनं एकदम निर्मळ आणि खूप धमाल करणार आहे.दुसऱ्याच दुःख ते आपल आणि सागळ्याना जीव भावाची साथ देणारासुद्धा...
"ए काय आल्यापासून बघतोय लक्ष कुठेय तुझ अग?
विसरलीस कि काय आम्हाला?तुझ्याशी बोलतोय मी" असा म्हणत त्याने पुन्हा एकदा टिचकी वाजवली.त्याच्या त्या आवाजाने माझ्या विचारला मात्र तूर्तास लगाम बसला खरा आणि मी हसून म्हटलं,
"हा तास काहीच नाही अरे !"
"काय मग झाली का सगळी प्रक्टिकल्स वगरे ?"
"आज काय झाल मग लेकचरला?"
"आता काय बाबा माजा आहे तुझी तुला हव ते सगळं मिळाल तुझ्या मनासारखं ! "
मी अगदीच विषय टाळायाचा म्हणून विचारलं.
"काय मग आता कॅलसेस असतील ना तुझे जाणार नाहीस का आज ?"
हो ना यार...!😣
"ए पण तुला काय झालंय तुझ तोंड पडलेलं का आहे अस क्लास मध्ये काही झालं का बोल ना
ए सांग ना काय झालं?"
आज सगळे कधी नवे ते सगळे भेटणार होते आणि त्यात मला माझा प्रॉब्लेम सांगून सगळ्यांचा मूड खराब नव्हता करायचा ...
इतक्यात हर्ष आला.आता हा हर्ष म्हणजे आमचा सगळ्यांचा खूप लाडका मित्र तो सायन्सला आहे. मुळातच कुशल बुद्धिमत्ता असणारा हा हर्ष सगळीकडे आपली सायंटिस दुष्टी जागृत ठेऊन निष्कर्ष काढणे हा त्याचा धंदा...
तो आला तेव्हा माझा फारस लक्षही नव्हतं. तो काहीतरी सगळ्यांना सांगत होता. मी मात्र स्वतःच्याच विचारात..
"काय ग घरी काही प्रॉब्लेम झालाय का ?"
सगळ्यांचं तेच चालू होत; मी शेवटी वैतागून म्हटलं, नाही रे काही नाही झालाय.
"काय नाही रे घरचे ओरडले असतील नाहीतर भांडून आली असेल अजून काय असणार ...! स्पृहा
हळूहळू सगळे जण जमायला लागले प्रतिमा, स्पृहा, हर्ष केदार ,प्राची आणि मी असा आमचा ग्रुप ...प्रतिमा फार बोलणारी नाही,तर स्पृहा एकदम शांत कधीतरी एकदमच बॉम्ब फेकल्यासारखं मधेच काहीतरी बाडबडणारी...केदार तसा शॉर्ट टेम्पर होता
पटकन चिडणार पण बाकी मनान चांगला होता! आता सगळे शांत झाले होते आणि मी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होत.
मी उगीचच विषय पुन्हा टाळायचा म्हणून म्हटलं चला क्लासला उशीर होतोय जातंय ना तुम्ही मलाही लवकर. घरी जायचंय वाट पाहत असतील घरी निघूया?
केदार आधीच चिडलेला होता, त्यात माझ्या अश्या बोलण्यावर तो अजून वैतागला.
त्याने मग बोलायला सुरुवात केली, "जाऊदे ना ,नाही सांगायचं तर नको सांगू इथे सगळे जण तुझ्यासाठी थांबलेत आणि तू सोड!"
तो चांगलाच वैतागला होता. त्याचे तुटक शब्द माझ्या कानावर पडत होते. तो म्हणत होता काही तरी की, त्याच्या आई वडिलांनचा असा मत होत, त्यांना वैद्यकीय शिक्षण घ्यावा मात्र त्याचा हट्ट होता कंपनी सेक्रेटरी होण्याचा. त्यानं घरच्यांच्या मन विरुद्ध कॉमर्सला ऍडमिशन घेतले. त्यामुळे घरचे आता रोज त्याला त्यावरून ऐकून दाखवतात रोजचा वाद असतो घरी आणि मग हा वैतागतो.
"शांत हो रे! या सगळ्याचा राग तिच्यावर काढून काय होणार आहे सांग मला ...",एक जण
आता मात्र एक क्षण सगळीकडे खूप शांतता पसरली. मी काय बोलते या कडे सगळेजण पाहत होते. मला सुरुवात कुठून करावी हेच सुचेना मग मी बोलायला हळू हळू सुरवात केली.
त्याच असं आहे की मला अर्टसला जायचा होत. खूप काही करायचंय रे मला हे कॉमर्स नको होत. पण आई बाबा ऐकायलाच तयार नाहीत, त्यांचही एका अर्थी बरोबरच आहे म्हणा, बीकॉम केल्यावर नोकरी पटकन मिळते आणि शिवाय आम्ही दोघीही मुलीच सो पुढच्या खर्चाचा विचार करता त्यांनी त्याच्या बाजून विचार केला. पण मला नाही हे मनापासून कारावास वाटत. इतक एका श्वासात बोलल्यानंतर मात्र माझ्या मनाचा बांध फुटला प्रत्येकाचेच काही ना काही प्रॉब्लेम्स होते, आणि आम्हीच एकमेकांचे सोबती होतो.
खरंच कधी कधी आपले पालक आपल्या पातळीवर येऊन का नाही विचार करत! खरच अस झाल असता तर ...
"जाऊदे .. जर तर च्या गोष्टी झाल्या अग या! असुदे पण तुला अश्या कितीतरी गोष्टी या व्यतिरिक्तही करता येतील कि म्हणजे इव्हेंट्स लेखन आणि स्पर्धा ही हा फक्त तुला घरी न सांगता करावं लागेल हे खरं ",स्पृहा
ते तर आहेच ; आता आपण आपल्या शाखा तर बदलु शकत नाही ; पण आहे त्यातून काहीतरी वेगळं एकमेकांच्या मदतीनं नक्कीच करू शकतो. ठरल तर मग आपल्या आनंदाचे मार्ग आपणच शोधायचे ! अस म्हणून नव्या उमेदीने मन जागा झाल.एक खूप चांगला संकल्प करून आम्ही सगळे कॉलेज च्या बाहेर पडलो .आजचा रस्ताही तोच होता झाडंही तीच वर्दळ हि नेहेमीचीच पण आज सगळंच कसा वेगळा आणि मोकळ वाटत होत.घर कधी आल ते कळलंच नाही. आई दारात वाट पाहतच उभी होती ."काय ग किती उशीर? लवकर यावा,आज तुझ्या आवडीची मस्त खीर केलीय जा लवकर हात पाय धूऊन घे ..."
अरे वा ! ,मी.
"काही नाही ग असाच आज सगळे जण भेटलो मग गप्पा झाल्या तुला माहितेय का ....",मी.
माझी अखंड बडबड पुन्हा चालू झालेली पाहून आईला आज खूप बार वाटलं. इतके दिवस शांत असणारी मुलगी आज आईशी खूप मनमोकळेपणाने बोलत होती. आईच्या डोळ्यात दोन क्षण पाणी आलं आणि ती तशीच माझ्याकडे पाहत उभी राहिली ;कारण आज तिला तिची मुलगी खऱ्या अर्थाने परत मिळाल्यासारखी होती.
गुरुवार, १२ जानेवारी, २०१७
"मन की बात !"









