शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

'दृश्यम 2' एक रहस्य तुम्हा आम्हा सगळ्यांना उलगडलं पण 'त्यांना' नाही

 



बऱ्यापैकी आताचे आलेले सिक्वेल हे निराशाजनकच आहेत असं वाटत होतं. मात्र दृश्यम 2 ने हा दृष्टीकोन बदलला. पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता ताणून ठेवणारा हा सिनेमा आहे. तुम्ही अगदी पहिल्या सीनपासून प्रत्येक क्षण तितक्याच उत्सुकतेनं पाहता. 7 वर्षांपूर्वी घडलेल्या घटना सतत आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. पोलीसही केस पुन्हा ओपन करतात पहिल्या भागाप्रमाणेच पोलिसांच्या हाती ठोस पुरावे लागत नाही. 

एक सीन असा येतो की वाटतं सगळं संपलं आता सत्य समोर येणार आणि विजय सालगावकर तुरुंगात जाणार. मात्र लेखक आणि दिग्दर्शकाने अशी काही जादू केली आपणही चाट पडतो. ही तर सुरुवात आहे, अजून बरंच बाकी आहे. 

दृश्यमचा पहिला भाग जेवढा सरळ होता त्यापेक्षा दृश्यम 2 जास्त इंटरेस्टिंग आहे. घी सीधी उंगलीसे ना निकाले तो टेढी करनी पडती है. त्याच प्रमाणे पोलीस पुन्हा तीच 7 वर्षांपूर्वीची केस ओपन करतात पण शेवटपर्यंत त्यांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नाही.

विजय सालगावकर म्हणजेच अजय देवगणने एक सामान्य नागरिक असून खूप परफेक्ट प्लॅनिंग करून या गोष्टी केलेल्या असतात. त्याने होणाऱ्या परिणामांचाही विचार केलेला असतो. 

तीन सीन असे आहेत जेव्हा असं वाटतं की आता पत्नी सगळं सांगून टाकेल. काही गोष्टी ती नकळत बोलून जाते. त्यातूनही विजय सालगावकर कसं डोकं लावून कुटुंबाला बाहेर काढतो. त्याचं प्लॅनिंगच एवढं जबरदस्त असतं की आपण विचारही करू शकत नाही. इकडची गोष्ट तिकडच्या बोटावर करावी तेवढं अगदी उत्तम पद्धतीने तो या गोष्टी हाताळतो. 

सिनेमात त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. मी नेहमी मनं आणि बुद्धी यामध्ये माझ्या बुद्धीचं ऐकत आलो आहे आजही तेच करणार. तो शेवटपर्यंत रहस्य आपल्या कुटुंबाकडे उलगडत नाही. साम-दाम-दंड-भेद सगळ्या प्रकाराने पोलीस प्रयत्न करतात. पोलीस हत्या कुणी केली आणि देशमुखांच्या मुलाची हत्या झाली इथपर्यंत म्हणजे सत्यापर्यंत पोहोचतात मात्र त्यांना एकही पुरावा मिळू शकत नाही. तो का मिळू शकत नाही हे पाहाणं जास्त मजेशीर आहे. पुराव्या अभावी पुन्हा एकदा विजय सालगावर या सगळ्यातून सुटतो. 

शेवट तर आणखी भन्नाट आहे. विजय सालगावकर एक स्टोरी लेखकाला सांगतो. त्यावर त्याला सिनेमा काढायचा असतो. ही स्टोरी त्याची स्वत:ची असते असं ती स्टोरी ऐकल्यानंतर आपल्याला समजतं. पण त्याचा पुढचा क्लायमॅक्स तो लेखकासोबत बसून तयार करतो आणि पुढे कसं ते घडत जातं हे त्यामध्ये दाखवलं आहे. मी या सिनेमाला 10 पैकी 10 स्टार देईन.

का पाहावा दृश्यम 2

- पहिल्या भागापेक्षाही अति उत्सुकता निर्माण करणारा 

- गाण्याचा भडीमार नसलेला

- प्रत्येक क्षण तुम्हाला पुढे काय घडेल याची उत्सकता जागृत करतो

- उत्तम कथा आणि अभिनय यासाठी पाहावा

- सिनेमॅटोग्राफीही उत्तम आणि प्लॉटिंग सुंदर

- प्रत्येक दृश्यं आपल्याला पुढचा सीन पाहायला भाग पाडतात, तुम्ही कुठेच दोन तास बोर होत नाही

दृश्यम सिनेमातून काय शिकायचं?

उत्तम नियोजन आणि दूरदृष्टी

तुम्ही ज्या गोष्टी कराल त्या फक्त तुमच्या बुद्धीला पटल्या पाहिजेत

तुम्ही जे ठरवलंय किंवा जे करताय ती कुठेही बोलू नये, त्यामुळे नुकसानच होतं

तुम्हाला प्रत्येक गोष्टीत पुढे काय घडेल त्यासाठी तुमचं किती नियोजन आहे याची आधीच कल्पना असायला हवी


क्रांती रविंद्र कानेटकर

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

#marriage story : लग्न का करावं? मला पडलेले काही प्रश्न

लग्न करावं की नाही?
सध्या सोशल मीडियावर किंवा लग्नात एक टोमणा सहज मारला जातो आमच्यावेळी सगळं अॅडजेस्ट झालं. कुठे बिघडलं काही? आजकालच्या मुलींना अक्कल जरा जास्तच आहे नाही का? म्हणून त्यांच्या मागण्या वाढतात. आजकालच्या मुलींना वेळेत लग्न नको असतात. मुलांचं प्लॅनिंग नको असतं. असे एक नाही अनेक बोल सहज लावले जातात. हे बोल लावणाऱ्यांमध्ये महिलाही मागे नाहीत हे विशेष आहे. 

या मुलींना जरा जुळवून घ्यायला नको असतं. प्रत्येक छोट्या गोष्टीला डोक्यावर घेतात. जरा म्हणून अॅडजेस्टमेंट नाही. आमचं सगळं व्यवस्थित झालं कुठे बिघडलं काही.... खरंच कुठे बिघडलं काही... जे बिघडलं ते तुम्हाला पाहाता तरी आलं का? तेवढा डोळसपणा असता तर हा प्रश्न किंवा ही शंका मनात राहिलीच नसती.

मुली जरा शिकल्या, चांगल्या नोकरीला लागल्या आणि स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. आता सगळंच बिघडलं इथे काहीसं... वाटलं ना आश्चर्य. पहिल्यापासून पितृसत्ताक पद्धत असल्याने काही गोष्टी ह्या सहाजिकच समोरच्या मनात खूपत असतात. बोलणारे बोलत असतात. 

ती आपल्यापेक्षा वरचढ होतेच कशी? कमावयला लागली म्हणजे जास्त अक्कल आली का?  हेच मुळाच अनेक ठिकाणी मानसिकता असते. ती उधळी आहे, तिने फक्त घर बघावं, नवऱ्याच्या पोटाला चांगलं चुंकलं खायला करून खायला घालावं, सणवार करावेत आणि त्यानंतर मग नोकरी करून घरात चार पैसे आणले तर तेही घरासाठी खर्च करावेत अर्धे अर्धे. म्हणजे इथे पैसे अर्धे करण्याबाबत समानता असते बरं का? पण घरातली काम वाटून घेण्यामध्ये नाही. का कशासाठी याचं उत्तर नाही. (मुलगा किंवा मुलगी दोन्ही  बाजूनं काहीशी हीच स्थिती आहे)

यालाही काही ठिकाणी नक्कीच अपवाद आहेत नाही असं नाही. पण लग्नाआधी प्रत्येक मुलीला काही गोष्टींचे धडे दिले जातात. बघ सगळं तुला अॅडजेस्ट करून घ्यायचं आहे. वाद झाला तरी आपण गप्प राहावं, जास्त बोलू नये वाद वाढतात. सगळं घर मुलीच्या खांद्यावरची जबाबदारी आहे सांभाळून ठेवायची. 

आपण बोलून वाद वाढवू नये. नवऱ्याचं ऐकावं. आपलं घर बांधून ठेवावं, पण मला एक प्रश्न आहे...मुलाकडे असं समजावलं जात असेल का? बायकोला मदत करावी, वाद टाळावेत, बायकोची साथ द्यावी, बायकोच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहावं यासारख्या अनेक गोष्टी....

गेल्या वर्षभरात माझ्या ऐकण्यात पाहण्यात किंवा अनुभवात आलेली वाक्य तर फार भयंकर आहेत. त्यावरून मला एकंदरीत असं वाटलं की एकतर मुलीला मोलकरीण समजतात किंवा विकायला ठेवतात तशी वस्तू समजतात. माफ करा असं म्हणण्याचं कारण म्हणजे ऑनलाइन नाव नोंदवलंय सब्स्क्रिब्शन संपण्याआधी लग्न जमलंच पाहिजे. नाहीतर पैसे वाया जातील असं कोण म्हणत असावं?  

मुलगा कसाही असला तरी आम्हाला चालेल पण तो जातीतलाच पाहिजे. मग पगारही कमी का असेल किंवा आणखी त्याच्यातील त्रुटीही मान्य. अरे बाकी सगळं तर चांगलं आहे नोकरीच सोडायला सांगतोय ना मग कुठे बिघडलं? सोड नोकरी काय त्या नोकरीत ठेवलेलं.

सकाळ संध्याकाळ जेवण करून घरातील सणवार करणारी आणि सगळं सांभाळणारी मुलगी पाहिजे. नाहीतर मुलगी नको. नोकरी करणारी तर हवी पण शनिवार रविवार सुट्टी हवी. 

सणवाराला सुट्टी हवी घरातलं कोण करेल. मी तर बुआ आईला आजारी असतानाच मदत केलीय तर आता तिनेच पाहायला हवं. आता गंमत अशी आहे की दुसरी बाजू मुलाची पण आहे बरंका ती फार मजेशीर आहे. 

बायकोला पाठिंबा दिला तर आई आणि समाजाच्या नजरेत बायकोचा बैल, नवरा-बायकोनं वाद टाळण्यासाठी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तर हेच लोक उद्या घर फोडलं म्हणून ओरडणार. मुलगी स्वत:च्या पायावर उभं राहिली किंवा तिला सपोर्ट केला तर भाई इगोच हर्ट होतो. घरातल्यांचा तरी नाहीतर.... समजून घ्या. 

आता यामध्ये आंतरजातीय विवाह आणि मुलगा चांगला असणं हे भाग आणखीन वेगळे आहेत. कारण इथे समाज आणि काईंड ऑफ मानसिकता, वातावरण, वागणूक असे अनेक कंगोरे निघतात. 

या अख्ख्या लग्नाच्या धिंगाण्यात कोणीच हे पाहात नाही की मुलगी स्वत: 2 पैसे कमवायला शिकली तर अडीअडचणीला तिची मदत होईल. 

मुला-मुलीचं पटलं तर उद्या त्यांचा संसार सुखी होईल. आपल्याकडे जी बोलणारी तोंड आहेत ती कधीच मदतीला येत नाहीत. बोलणाऱ्यांना आज तुमचा विषय आहे उद्या दुसऱ्यांचा मिळेल. 

आज मुलगा चांगला कर्तुत्ववान आहे की नाही तो सपोर्ट करणारा आहे की नाही हे पाहायचं सोडून अजूनही आपण त्याच त्याच गोष्टीत गुरफटतोय. त्यातून होणारे वाद, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, छळवणूक आणि घुसमट ही दिवसेंदिवस वाढणारी आहे. ही फक्त मुलींचीच असं नाही बरं मुलांचीही तेवढीच आहे. 

डिमांड फक्त मुलींच्या दिसतात पण मागणी घालणाऱ्या कुटुंबाच्या नाही. ते मागणी करतात ती डोळ्यात दिसणारी नसते पण मुलीच्या स्वाभिमानाला नक्कीच ठेच पोहोचवणारी असते. 

नोकरी सोड सांगणं सोपं आहे पण ती मिळवण्यासाठी खेटे घालणं आणि धडपड करणं कठीण आहे. मला वाटतं सप्तपदीमध्ये आणखी काही वचनं द्यायला हवीत.जी फार गरजेची आहे. 

शेवटी समाज काय म्हणेल इथे सगळं अडतं हो. पण समाजातील लोक कधीच गरजेला तुमच्या मदतीला येत नाहीत. ना जातीतले. अहो इथे रक्ताचे लोक हात झाडायला कमी करत नाहीत. 

आपली जबाबदारी कशी संपेल याकडे लक्ष लावून असतात. शेवटी कामी येतात ती आपण आपल्या स्वभावातून जपलेली नातीच. तिथे कास्टचं किंवा समाजाचं बंधन नसतं पण तिथे नक्की आपुलकी असते. 

अडल्या नडल्या प्रसंगाला उभं राहण्याची ताकद असते. समजातील बोजाखाली आपण पुन्हा मागे जात आहोत. फक्त जबाबदारी संपवायची म्हणून एकदा लग्न उरकून मोकळे होत आहोत. 

मग पटलं तर ठिक नाही तर पटवून घ्या. नाहीतर एक्स्ट्रामॅरिटल अफेअर होतात ती वेगळी त्याला कारण आणि कंगोरेही वेगळे आहेत. 

पटत नाही म्हणजे काय शारीरिक भूक भागवण्यासाठी काही आपला रस्ता वेगळा निवडतात तर काही मानसिक गरज भागवण्यासाठी त्यामध्ये कोणीतरी एक फसतं तर कुणाचं तरी फावतं. नाहीतर आज आजूबाजूला एवढ्या बातम्या आणि घटना पाहायला मिळाल्या नसल्या. 

आता इथे संस्कार हा मुद्दा आणू नका. कारण मुळातच ते पितृसत्ताक पद्धतीनं वडिलांचा आणि थोरामोठ्यांच्या धाकातले संस्कार असतात. जिथे आईला स्वातंत्र्य कमी आणि वडिलांना जास्त असतं. त्यामुळे संस्कार नाहीत वगैरे या गोष्टी गौण आहेत. त्यासाठी आपले विचार बदलणं हाच एक मार्ग आहे.

आता मला पडलेले काही प्रश्न


लग्न का करावं? 

- जोडीदार मिळावा म्हणून आयुष्यभर साथ देणारा हवा म्हणून? मग तिथे वरील सगळ्या मुद्द्याचं काय?

- यामध्ये नकारात्मक भूमिका माझी नाहीय पण शिफ्ट ड्युटी किंवा नोकरीत काम करणाऱ्या मुलींना नोकरी सोडणं हा एकच पर्याय आहे का?

- सासूही कधीकाळी सून असते मग निवडलेल्या सूनेबद्दल इतकी इनसिक्युरिटी का? मुलगा बैल होईल, ती घर फोडेल, ती वाईट आहे.....ती गिळून टाकेल ही मानसिकता येते कुठून, मग लग्न करायचंच का? फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी?

- जर लग्न समजून घेणाऱ्या जोडीदाराशी करायचं तर तो निवडायचे निकश काय असायला हवेत? 

- मग समजूदार आणि कर्तुत्ववान मुलगा मिळाल तर जातीचे निकष किती लागू करायचे? मग वाळीत टाकण्याचे प्रकार होणार त्याचं काय?

- कोणतीच जात वाईट नाही कमी नाही किंवा उच्च नाही. प्रत्येकाचं अस्तित्व फार महत्त्वाचे आहे. राजकीय मतांसाठी राजकीय दृष्टीनं मतांचं राजकारण होतच राहणार. त्याबद्दल मला आता तरी काही मत मांडायचं नाही पण मग जाती-जातीतील विचारसरणी कशी बदलणार?

- लग्नाची परिभाषा बदलतेय असं वाटतंय का? एक व्य़वसाय, एक फॅशऩ किंवा एक करार किंवा एक मोलकरीण म्हणून घरी आणणं यापैकी एक होतंय का? 

- मुलगा-मुलगी दोघांनी मिळून घर सांभाळलं तर बिघडलं कुठे? भूक तर दोघांनाही लागते मग तिनेच करावं हा अट्टाहास का? घर दोघांचं आहे मग तिनेच जबाबदारी घ्यावी हा हट्ट का? 

मी अजूनतरी या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरं शोधते आहे. माझ्या सोबतच्या मुलींची लग्न होत आहेत त्यांना एक एक वर्षांची मुलं आहेत. पण मला अजूनही हा प्रश्न त्रास देतोय लग्न करायचं तर का? नुसतं कुटुंब वाढवण्यासाठी? जबाबदारी संपवण्यासाठी? आपलं माणूस शोधण्यासाठी? की आणखी काही....

का नुसतं कुटुंब वाढवायचं आणि जबाबदारीतून हात झटकून इतरांसारखं पटपट बाहेर पडायचं म्हणून हे सगळं करायचं की खरंच आपला जोडीदार निवडायचा आणि आपलं माणूस शोधायचं म्हणून करायचं? तुमच्याकडे याचं उत्तर असेल तर नक्की मला सांगा. 

धन्यवाद!

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

एक चूक...

          कुकरची शिट्टी वाजली तशी ती दचकली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण सपशेल फसवले गेले आहोत याची जाणीव तिला झाली. प्रेमातून झालेली फसवणूक की आपला आंधळा विश्वास म्हणून आपण हा निर्णय घेतला या प्रश्नात ती अजूनही अडकून पडली होती. पण आता मागे फिरण्याचा कोणताच पर्याय तिच्याकडे उरला नव्हता. एकतर एकट्यानं जगायचं किंवा आहे ते मुकाट्यानं सहन करत प्रेमात मिळणारे धक्के पचवण्याची ताकद वाढवायची. तिचे डोळे ओघळत होते. काय करावं हे सुचत नव्हतं. लग्नाला अवघे दोन महिने होऊन गेले होते. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केल्यानं माहेर आणि मित्रही तुटले होते. फक्त साहारा होता तो नवऱ्याचा पण तोही दिवसेंदिवस साथ सोडतोय की काय? याची भीती आता मनात घर करू पाहात होती. तुझ्यासाठी सगळं एडजेस्ट करतो म्हणणारा माझा सोहम आता रोज मीच कशी चुकते याचे धडे देत होता. आई त्याचे कान भरत होत्या आणि तो कोणताही न विचार करता बोलत सुटायचा,  लग्नानंतर इतका बदलेल असं जराही वाटलं नव्हतं. 6 वर्षांच्या आमच्या प्रेमात त्यानं असं कधी केलं मात्र. पण या सगळ्याला त्याच्या आईचीच फूस असेल असं कधीही वाटलं नाही मात्र आता समोर येणाऱ्या गोष्टी आंधळ्या प्रेमाची साक्ष देताना आणि रोज थोडं मनाला मारत आहेत. आपण केलेल्या चुकीची शिक्षा देत आहेत. 

   ‘अजून झालं नाहीच का तुझं. कासवाच्या गतीनं काम करते आहे. माझ्या मुलाला खाल्लंस आता या घरातल्या माणसांनाही माझ्याविरोधात नेऊ पाहातेय पण त्यांना काय माहीत ही किती आतल्या गाठीची आहे ते’. सासूबाई मागून जोरात ओरडत होत्या. घरातल्या सगळ्या गोष्टी करून नोकरी करून घरात पैसे देत असताना रोज मुलीऐवजी मोलकरणीसारखी वागणूक मिळत होती. यावर हळूहळू आता माझ्यात आणि सोहममध्ये वाद होऊ लागेल होते. 

    आज मात्र मी मनाशी पक्क केलं, आज काय वाटेल ते झालं तरी प्रत्येक गोष्टीचा जाब मात्र सोहमला विचारायचा. सोहम त्याचं काम आटपून संध्याकाळी घरी आला होता. कामाचा ताण जास्त होता का? कसा गेला दिवस? मी पाण्याचा ग्लास पुढे करत त्याला विचारलं. त्यांनं उत्तर देणं टाळलं आणि खोलीत निघून गेला. मला वाईट वाटलं कारण एकमेव सपोर्ट करणारा सोहमही आता माझ्यासोबत फटकून वागत होता. रात्री सगळेजण जेवायला बसलो. आज मी पहिल्यांदाच शेपूची भाजी केली होती. मी केलेल्या भाजीत हलकी हळद टाकली म्हणून सासूबाईंनी ती भाजी रागानं खाल्लीच नाही. नाकं मुरडत त्यावर चार नावं ठेवून मोकळ्या झाल्या. मी सोहमकडे पाहिलं. तो जेवणात मग्न होता. त्याला काही कशाचं मुळी पडलेलं नाही. मी मुकाट्यानं एकच पोळी खाऊन उठले सर्वांची जेवणं आटपली आणि सगळं आवरून खोलीत आले. सोहम आपल्या फोनमध्ये बिझी होता.

सोहम मला तुझ्यासोबत बोलायचं आहे.- मी

हा काय गं बोल ना लक्ष आहे माझं- सोहम

असं नाही, मला खरंच काहीतरी सांगायचं आहे- मी

मी दमलोय आणि तू तेच तेच सांगणार जे मी गेले कित्येक दिवस ऐकतोय आणि तुझी समजूत काढतोय- सोहम

अरे पण आपलं एकमेकांवर प्रेम आहे. तू मला साथ देणं आपेक्षित आहे. तू लग्नाआधी तसं मला तसं प्रॉमिस केलं होतं.- मी

हो की मी कुठे साथ सोडली आणि माझ्या आईला काम लागलेलं मला आवडणार नाही हे मी तुला लग्नाआधीही बोललो होतो.- सोहम

    ऐक ना पण मी सगळं करून घर सांभाळते. माझी त्याबद्दल तक्रार नाही पण आईंनी समजून घ्यायला हवं ना थोडं. त्याही या स्टेजला होत्याच ना कधीतरी- मी

इतर मुली करतात मग तुला का नाही जमत, उगाच काम करायचं नाही म्हणून कारण देऊ नको आणि माझं डोकं फिरवू नको. आई तुला तुझ्या चांगल्यासाठीच बोलते.- सोहम

अरे हो पण किती? जाता येताना घालून पाडून बोलत असतात. तूही त्यांची बाजू घेतोस. लग्न करून मी चूक केली का? लग्नाआधीच सगळं तोडलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं आहे- मी

    काय बोलतेय तू. प्रेम आहे आपलं आणि होईल सगळं नीट. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय तू प्लीज असं काही करू नकोस असं म्हणत त्यानं मला जवळ घेतलं आणि कपाळावर किस केलं. त्याला माझं प्रेम हवंय की घरात राबायला मी हवीय असा प्रश्न एक क्षण मनात आला. त्यानं मला कुशीत घेतलं आणि तो मात्र शांत झोपी गेला जसं काही घरात घडतंच नाही असं. मी मात्र मनातल्या विचारांनी अस्वस्थ होते. पडलेल्या प्रश्नांची उत्तर शोधत होते.

- क्रांती रवींद्र कानेटकर

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

रवींद्रनाथ टागोरांच्या कथा आणि मी...

आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी आहे. या निमित्तानं खास...
रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या काही कथांचा भाग नेटफ्लिक्सवर पाहिला. 26 कथा इतक्या सुंदर एकमेकांमध्ये गुंफल्या आहेत की त्याची लिंक कुठेही तुटत नाही. म्हणायला गेलं तर त्यातली प्रत्येक कथा वेगळी असली तरीही ती एकमेकांशी संलग्न आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या पत्रांमध्ये गोष्ट सुरू होते स्त्रीपासून आणि संपतेही तिथेच. 
पूर्वीच्या काळात स्त्रियांच्या असणाऱ्या समस्या आणि बदलू सगळ्या जाचातून मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीपर्यंतची त्यांनी बदलती मांडलेली भूमिका खूप सुंदर आहे. अगदी राजकारणापासून ते प्रेमापर्यंत आणि घरातली कर्तव्य बजवण्यापासून ते काम करण्यापर्यंत स्त्रीची वेगवेगळी रुप आणि प्रत्येक भूमिका आपल्या मनात घर करून जाते. आजही जसंच्या तसं अगदी घडत नसलं तरी त्या कथा कुठेतरी मनाला आपल्या अगदी आजही जवळच्या वाटतात. 
चोखेर बालीमधली सर्वगुणसंपन्न असूनही नाकारली जाणारी चोखेर जेव्हा राजकारण करून बालीच्या पतीला जिंकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती आजही मला भावते. तितकीच आवडते राग नाही येत पण तिच्याबद्दल मनाचा एक कोपरा हळवा होतो. 
कबुलीवाला मधली छोटी मुलगी मीनाही तितकीच मनाला भावते. लहानपणी स्वत:चं म्हणणं खरं करणारी मीना मात्र लग्नानंतर नवऱ्याचं सगळं ऐकते आणि केवळ गप्प बसल्यानं तिचा कसा बळी जातो. तेव्हाच्या काळी स्त्रियांना असणारं महत्त्व आणि स्वतंत्र्य या दोन्ही गोष्टी अगदी सहजपणे या कथांमध्ये सांगितल्या आहेत. बस तूम कुछ बोलना मत चूप रहेना...मी सगळं ठिक करेन असं म्हणणारा मीनाचा पतीच भावाला वाचवण्यासाठी बेकसूर असणाऱ्या मीनाला फासावर लटकवतो तेव्हा मात्र आपल्यालाच संताप येतो. ही मीना आजही मला तितकीच जवळची वाटते. कारण आजही परिस्थिती आणि गोष्टी बदलल्या तरीही गुन्हे करणारे मोकाट सुटतात आणि चूक नसणारे मात्र कायमचेच लटकतात.
बदलू पाहणारी आणि पंख पसरून उडणारी दो बहेन मधली अर्मिला जेव्हा तिच्याच बहिणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडते आणि तिची चूक समजल्यावर ती माफी मागून निघून जाते पण बहिणीचा संसार माडू देत नाही. प्रेमाचा त्याग आणि चुकीची शिक्षा... स्वत:चं लग्न मोडलं तरी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चिछ्छी लिहून ती मुंबईला निघून जाते.  
मृणाल की प्रतिमा...या कथेत नवऱ्यासाठी वेळ नाही आणि घरातही सगळं करून स्वत:साठी वेगळी वाट शोधणारी मृणाल पाहायला मिळते. तर अपरिचिता कथेमध्ये स्वाभिमानानं जगणारी स्त्री रेखाटली आहे. 
एकूणच 26 कथांमध्ये त्याकाळी समाजात आणि घरात असणाऱ्या स्त्रीयांचं स्थान आणि बदलू पाहणारी स्त्री. तिच्या भोवतालच्या समस्या आणि त्यातही ती स्वत: नवऱ्याचा आणि घराचा आधार बनून आपलं वेगळेपण निर्माण करण्यासाठी धडपडणारी स्त्री पाहायला मिळते. या कथांमध्ये प्रेम, मायेचा ओलावा आणि त्यावेळच्या असणाऱ्या परंपरा अगदी अधोरेखित करत छान मांडल्या आहेत.
यातली प्रत्येक कथा आताच्या काळात रिलेट करावी अशी वाटते. मनोरंजनासोबतच त्या काळी असणारी परिस्थिती आणि त्यातही स्त्रीचं स्थान...बदलू पाहणारी ती...अधोरेखित होते...
त्यातला एक संवाद मनाला चटका लावून जातो मला मुलगी पत्नी दुसरी मिळेल पण भाऊ नही किंवा स्त्रीनं घरातल्या कामांमध्ये मन रमवावं लेखाजोखा करण्यात नाही. अशा अनेक प्रसंगांमधून तेव्हा असणारी मानसिकता ही आजही काहीप्रमाणात असल्याचं आपल्याला भासत राहातं. एकूणच या कथा मनोरंजन तर करतात पण त्यासोबत तितक्याच आजच्या काळातही जिवंत वाटतात आणि हेच रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखनाच वैशिष्ट्यं आहे. 
- क्रांती कानेटकर
7 ऑगस्ट 2020

सोमवार, १५ जून, २०२०

#marriage story : काकांच, 'का...कू...' प्रेम, अजब प्रेमाची गजब कहाणी...


      नवरा माझं कौतुक करत नाही आणि त्याचं माझ्यावर प्रेमच नाही ही प्रत्येक स्त्रीची ही तक्रार असते. आपल्याला दिसतं आणि वाटतं तसं नसतं, हे बऱ्याचदा आपल्या लक्षातच येत नाही. अगदी नवविवाहितांपासून ते सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येक नवरा-बायकोच्या नात्यात एक वेगळं प्रेम असतंच. कधी ते व्यक्त केलं जातं, तर कधी न व्यक्त होताही. वर्ष जशी सरतात तशी त्या नात्याची वीण अधिक घट्ट होत जाते आणि प्रेमही अबोल होतं. मात्र तरीही नवरा कौतुक करत नाही हा पाढा मात्र कायम सुरूच असतो. 
    नवरा कौतुक करत नाही आणि त्यांचं प्रेमच नाही अशी सतत कुरकुर करणाऱ्या 70 वर्षांच्या काकूंवर काकांचं मात्र खूप जास्त प्रेम आहे. बऱ्याचदा काकूंना मात्र ते प्रत्यक्षात दिसत नसल्यानं किंवा काकांनी बोलून व्यक्त न केल्यानं गेल्या 40 वर्षांपासूनची काकूंची कुरकुर सुरू आहे. ही कुरकुर काका मात्र अगदी मिश्कीलपणे घेत तिच्यावर अपार प्रेम करतात. त्यांच्यातील या अबोल प्रेमाची ही छोटीशी कथा शब्दात मांडण्याचा प्रयत्न.
     काका तसे खूप शांत, अगदी मोजकं आणि कामापुरतं बोलणारे. काकू मात्र त्याच्या अगदी बरोबर उलट्या स्वभावाच्या. सतत बोलून व्यक्त व्हायचं जे मनात आहे ते सांगून मोकळं होणाऱ्या. नवरा आपलं कौतुक करत नाही आणि आपल्यावर प्रेम नाही कायमच ते फक्त कामापुरतं बोलतात. बाकी त्यांना काही पडलेलं नसतं काकूंची कायम तक्रार असते. रोज दोघांनीही संध्याकाळी 4.30 वाजता एकत्र बसून चहा प्यायची त्यांची नियमित सवय. काम करून जास्त दमल्यामुळे सहज त्यांना पडल्यापडल्या झोप लागली. काका मात्र चहाच्या वेळेनुसार उठले. पाहिलं तर शांत झोपल्या होत्या. त्यांना पाहून काकांनी हळूच पडदा ओढून घेतला. 
      मला खाली दूध आणायला जायचं होतं. मी काकांना सांगून दूध आणायला निघाले. त्यावेळी काका हळूच म्हणाले, 'बेल वाजवू नको हा! काकू झोपली आहे; दारावर टकटक कर, मी दार उघडेन.' मी फक्त हसून दूध आणायला निघून गेले. मी दूध घेऊन घरी आल्यावर दारावर टकटक केलं तर काका खरंच दाराजवळ उभे होते. त्यांनी शांतपणे दार उघडलं आणि निघून गेले. काकूंची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी मला दाराची बेल वाजवू नको असं सांगितलं होतं. चहाची वेळ उलटून गेली असतानाही त्यांनी उठवलं नाही. काकांचं न बोलताही काकूंवर असणारं हे अबोल प्रेम त्यादिवशी मला जाणवलं आणि खूप अप्रूपही वाटलं. 
     दुसरा सांगण्यासारखा प्रसंग म्हणजे त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष उलटून गेल्यानंतरही काकांना घरी कायम काकूंनी जेवण वाढायला हवं असा हट्ट असायचा. अन्नपूर्णा असलेल्या आपल्या बायकोने जेवण वाढल्याशिवाय गळ्याखाली काही घास उतरायचा नाही. जेवण तयार असेल आणि काकूंनी वाढलं नाही तर ते हातानी घेत नाहीत. काकूची वाट पाहतात किंवा दूध ब्रेड खातात. पण तिने जेवण आपल्या हातानं वाढून द्यावं हा हट्ट मात्र त्यांचा आजही कायम आहे.
    खरंच, आपल्याला बोलणाऱ्या किंवा व्यक्त होणाऱ्याच्या मनातील भावना, प्रेम दिसतं, कळतं, जाणवतं बोलून मोकळे होतात हे दिसतं. पण जे व्यक्त होत नाही त्यांना समजून घेणं आणि त्यांचे प्रेम कळणं फार कठीण आहे. काका प्रत्येक क्षणाला जरी प्रेम व्यक्त करत नसले तरी काकूंप्रती असलेली काळजी, जिव्हाळा आणि प्रेम हे कित्येकदा त्यांच्या कृतीतून दिसतं. खूप छोट्या गोष्टींचीही ते नकळत काळजी घेतात त्यात कुठेही दिखावा नसतो. 100 गिफ्ट, प्रेमाचे केवळ दोन शब्द आणि खोटी स्तुती करण्यापेक्षा त्यांनी अबोल पण चिरंतर असं हे प्रेम आपल्या मनात आणि कृतीत जपलं आहे. 40 वर्ष लग्नाला उटल्यानंतरही आज काकू कितीही कुरकुर करत असल्या तरीही ते कोणतीही तक्रार करत नाहीत. या उलट ते मिश्कीलपणे घेत तू बरोबर आहेस असं म्हणून तिचं मन राखण्याचा कायम प्रयत्न काका करतात.
क्रांती कानेटकर
-दिनांक- 15 मे 2020, मुंबई

रविवार, १४ जून, २०२०

संवाद संपला की वाद होतो? पण बोलायला खरंच वेळ आहे का? लॉकडाऊनमधला माझा अनुभव


प्रातिनिधिक फोटो

          काम करत असताना रविवारी (14 जून ) अचानक ट्वीट दिसलं. सुशांत सिंह राजपूतनं गळफास घेऊन आत्महत्या केली. एम. एस. धोनी हा मी पाहिलेला त्याचा चित्रपट. त्याच्या आत्महत्येबाबत आधी वाचून विश्वास बसेना, बातमी कन्फर्म आहे का हे पाहण्यासाठी इतर वेबसाईटवर शोधाशोध सुरू झाली आणि काही सेकंदात ही बातमी खरी ठरली. सगळ्यांनाच अचानक आलेल्या या बातमीनं मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ, फोटो आणि कोट्स पुढच्या काही सेकंदात व्हायरल होऊ लागले. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता सुशांतसोबत असं नेमकं काय घडलं असावं की त्याला आयुष्य संपवण्याची वेळ आली? दुसरं म्हणजे त्याचं मन मोकळं करायला खरंच हक्काची व्यक्ती नव्हती का की त्याला असा निर्णय घ्यावा लागला? य़ा प्रश्नांनंतर  सोशल मीडियावर अनेक पोस्ट फिरायला लागल्या आत्महत्या ही पळवाट आहे मनातल्या गोष्टी शेअर करायला हव्यात. बोलायला हवं... सगळं खरं असलं तरी माझ्या मनात आलेला सर्वात पहिला प्रश्न होता कुणाशी बोलायचं?
       स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण आपल्या व्यापात व्यस्त आहे. प्रत्येकाला या स्पर्धेत टिकायचं आणि जिंकायचं आहे. मोबाईल, टीव्ही, वेबसीरिज, ऑनलाइन खेळ आणि कामाचं शेड्युल या सगळ्यात हरवला आहे तो संवाद. हा संवाद कुणाशी आणि कसा साधायचा हाच मोठा प्रश्न आहे. ज्याला हे सगळं सांगावं ती व्यक्ती किती गोपनीयता बाळगेल? त्याचा गैरफायदा घेणार नाही ना? आपलं म्हणणं ऐकायला आणि समजायला त्याच्याकडे वेळ तरी आहे का? असे अनेक प्रश्न आजच्या या घटनेनंतर अधिक जास्त मला पडायला लागले.
हे प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण होतं ते म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझं असलेलं एकटेपण. तुम्ही कितीही बतावण्या केल्यात तरी व्हर्च्युअल जगाचा एका लिमिटनंतर कंटाळा येतो. किमान मला तरी खूप त्रास व्हायला लागला. लॉकडाऊनच्या काळात आपल्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब एकटं राहायचं, जिथे बोलायला आणि भेटायला लॉकडाऊनमध्ये कुणी येऊ शकतं नाही. प्रत्येक जण आपल्या व्यापात किंवा गॉसिप करण्यात व्यस्त असतो. कुणाला फोन करून बोलायची आणि वेळ मागायचीही चोरी झाल्यासारखं वाटलं मला.
       गमतीचा मुद्दा असा की लॉकडाऊनआधीही असे किती आणि कुठे कुणी बोलायचे कारण जो तो मोबाईल आणि आपल्या व्हर्च्युअल जगात किंवा कामात बिझी असायचा. यावरून मित्र-मैत्रीणींसोबत अनेक वादही झाले पण संवाद काही होऊ शकला नाही. प्रत्येकनं सुचवलं वेबसीरिज पाहा, वाच, लिही किंवा सिनेमा बघ काहीच नाही तर झोप काढ. पण हे त्या सगळ्यांसाठी फार सोपं होतं असं वाटायला लागलं होतं; कारण ते घरात कुटुंबात राहात असल्यानं त्यांच्या भोवती माणसं होती. सलग 3 महिने एका खोलीत मोबाईल, लॅपटॉप आणि तुम्ही एवढंच राहिलं तर एका वेळेनंतर जे फ्रस्ट्रेशन येईल तशी माझीही चिडचिड पहिल्या महिन्यात वाढायला लागली होती. सतत माणसात राहाणं आणि बोलण्याची सवय असल्यानं एकटं राहण्याचा हा अनुभव फार वेगळा आणि सुरुवातील खूप त्रासदायक होता. आता मात्र हळूहळू या वातावरणाची सवय व्हायला लागली. राहून राहून आता मलाच माणसं किंवा होणारा संवाद हा फक्त कामापुरता व्हावा असं वाटू लागेल अशी भीती मनात यायला लागली. काहींना ही नक्कीच नकारात्मकता वाटेल पण एका लिमिटनंतर डोकं भणभणायला लागतं हे पण तितकंच खरं आहे. 
     आपल्याला लहानपणापासून माणसात राहण्याची किंवा सतत कोणीतरी सोबत असण्याची एक सवय झालेली असल्यानं हा एकटेपणा खायला उठतो. कितीही व्हर्च्युअल जग मोठं आणि चांगलं वाटत असलं तरीही आपल्या माणसांसोबत होणारा संवाद हा त्यापेक्षा जास्त आनंद देणार असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या स्वार्थी वृत्ती आणि आत्मकेंद्रीपणामुळे नात्यातील संवाद संपून वादाची ठिणगी पडत असल्याचं पाहायला मिळालं. ब्रेकअप पासून ते घटस्फोटापर्यंतचं प्रमाण आणि लग्नानंतर केवळ नवऱ्याकडून प्रेम मिळत नाही म्हणून बाहेर होणारे प्रेम प्रसंग ह्या गोष्टींचं प्रमाण कुठेतरी वाढतंय असं ब्लॉग, बातम्यांमध्ये वाचनात आलं. नात्यातला वाद आणि वाढणारं अंतर यामुळे आपण जवळपास अर्ध मशीन झालोच आहोत. येत्या काळात पूर्ण मशीन होऊ अशी भीती वाटायला लागली आहे. यामधून वाढणारा आत्मकेंद्रीपणा, प्रॅक्टीकलच्या विचारांच्या नावे आपण करत असलेल्या कृतीनं नात्यातील संवादाचा गळा घोटत आहोतच पण वादाला मात्र जागा करून देत आहोत.
      मन हलकं करण्यासाठी, नात्यातील प्रेम वाढावं, प्रश्न सोडवण्यासाठी आणि सुटावेत म्हणून इथपासून ते अडीअडचणींना एकमेकांच्या पाठिशी उभं राहाता यावं म्हणून एकमेकांसोबत मनमोकळेपणानं संवाद साधायचा असतो. त्यातून घर, मित्र परिवार, आपली नाती तयार होतात. पण याच संवादाचा कुणीही गैरफायदा घेऊ नये किंवा गैरवापर करू नये ही एक धास्ती मनात असते. व्हर्च्युअल जगात ते ऐकायला कुणी नाही म्हणून कित्येकदा गोष्टी शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी दोन गोष्टींची आतातरी गरज आहे असं मला वाटतं. जी आपल्या पातळीवर करता येईल. एकतर आपण इतकं एकटं राहायला शिकायला हवं की सगळं झेलायची ताकद हवी. आपल्याला कुणाचीही गरज पडणार नाही याची ठाम स्वत:च्या मनाला शाश्वती द्यायला हवी. थोडक्यात आपणच आरशासमोर आपलं शिल्पकार व्हायचं. दुसरं म्हणजे आपल्या सगळ्या कामातून म्हणजेच दिवसातल्या 24 तासांतून किमान काही मिनिटं महत्त्वाच्या नात्यांसाठी वेळ देणं आणि संवाद साधणं... नाहीतर शरीरानं नाही पण मनानं मात्र अनेकांना आत्महत्या करण्याची वेळ काही दूर नाही असं मला वाटतं...
- क्रांती कानेटकर
- दिनांक- 15 जून 2020, मुंबई

गुरुवार, २६ मार्च, २०२०

#21Days: कोरोनाने कुछ तो करना सिखा दिया, पण काळजी घ्या



कोरोना, चीन, भारत, जनता कर्फ्यू, लॉकडाउन, कोरोना रुग्ण हेच शब्द गेल्या काही दिवसांपासून कानावर पडत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आणि लोकं घरातच बंद झाली. अत्यावश्यक गोष्टी वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार असं सांगितलं. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसंच नागरिकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. लॉकडाउन झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत आलेला अनुभव विसरता येणार नाही असाच आहे. प्रत्येकाला असे काही ना काही अनुभव आलेच असतील. कोणी प्रवास करताना अडकलं असेल. गाड्या मिळाल्या नसतील किंवा इतर अनेक अडचणी आल्या असतील.

माझाही अनुभव त्यापेक्षा काही वेगळा नाही. एका अशा शहरात जिथं एकटं राहताना सगळं बाहेरून घ्यावं लागतं. तिथं अचानक लॉकडाउन केलं जातं तेव्हा एकाच वेळी अनेक प्रश्न समोर उभे राहतात. ते प्रश्न सोडवताना जी काही तारांबळ उडते त्याचा अनुभव घेतला.  आपण सुरू केलेल्या डब्ब्याची सेवा बंद होते. जेवण स्वत: करून खाणं म्हणजे काय हे माहितीच नसल्यानं शिजवण्याचा प्रश्नच नसतो. त्यातच वर्क फ्रॉम होम ते सांभाळायचं असतं. आपल्या कामाच्या वेळेनंतर बाकीच्या गोष्टी करताना गोंधळ उडतो. आदल्या दिवशी आपल्याकडं काही असण्याचा तसा संबंध नाही. रोज लागेल ते थोडं घेऊन यायचं आणि वापरायचं असाच दिनक्रम. त्यामुळे लॉकडाउन झाल्यानंतर साहित्य आणायचं कुठुन असा प्रश्न. बरं बाहेर जावं तर सर्व दुकानं आधीच बंद झालेली असतात. त्यामुळे खाण्याचे पूर्ण वांदे आणि टीव्हीवर सांगितलं जात आहे किराणा मालाची दुकानं उघडी आहेत. बस फक्त चिडचिड होते. कारण आपल्याकडे शिल्लक नाही आणि खरेदी करायला काही सुरू नाही. काहीच नाही तर शोधू मिळालं तर ठीक नाही तर उपवास घडणारच म्हणून थोडं अंतर चालत शोधमोहिम सुरू केली. तेव्हा एक पेरूवाला आणि दूधाची डेअरी चालू उघडलेली दिसली.  दूध घेऊन रुमवर आले. त्यादिवशी दूध आणि पेरू एवढ्यावरच भागवावं लागलं. तो दिवस ढकलावाच लागला. काही पर्यायच नव्हता. सुदैवानं बिस्कीटं आणि मूग होते. बिस्किटं कॉफिसोबत खाल्ली आणि मूग भिजत घालून खाल्ले. पण हे किती पुरणार होतं. त्यातही उद्यासाठी काय मिळेल का याची शंका त्यामुळं थोडं शिल्लक ठेवावं लागलं. उद्या काय मिळेल आणि कसं याचा प्रश्न आ वासून समोर होता. कसाबसा पहिला दिवस गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर झाला होता. मोदींनी केलेल्या घोषणेनंतर सकाळी 8 ते 10 दुकानं उघडी राहणार होती. धावत पळतच बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर पाकिट उघडलं तर तिथंही ठणठणाट. तर अडचणींना सुरुवात झालेली. आता त्यात एटीएम होतं पण पैसे काढायला लागणारं एटीएम मशिन बंद होती. जवळ असलेली 5 एटीएम मशिन पण त्यात खडखडाट. झालं आता आणखी एक पर्याय शोधा. एक समस्या सोडवताना दुसरी समस्या समोर तयार होती. नवीन भाग असल्यानं त्याबद्दलची माहितीही नव्हती. कुठे काय मिळेल हे शोधावं लागणार होतं. लॉकडाउनमुळे विचारायला रस्त्यावरही इकडं तिकडं कोणी नव्हतं. उशिर झालेला आणि 10 वाजायला काहीच मिनिटं होती. त्याच वेळेत एटीएममधून पैसे काढावे लागणार होते. कारण दुकानंही बंद होण्याची शक्यता होती. त्यानंतर संध्याकाळी उघडतील की नाही माहीत नाही. पुन्हा सामान संपलं तर काय? भीतीनेच पोटात गोळा आला.  जवळपास एक-दीड किलोमीटर चालल्यानंतर रांग लागलेलं एटीएम दिसलं. हुश्श म्हणत सुस्कारा सोडला. रांगेत उभी राहिले. सुदैवानं रांग लवकर संपली आणि थोडे ज्यादाचेच पैसे काढून मी आनंदान बाहेर पडले.

पैसे काढले आता त्या पैशातून जे साहित्य खरेदी करायचं होतं त्याचं दुकानं शोधण्याची वेळ होती. सगळं बंद असताना आणि पोटात कावळे ओरडत असताना स्वस्त आणि महाग हा विचार करण्यापेक्षा जे मिळेल जसं मिळेल ते घ्यावं लागत होतं.  दुकानदारही चढ्या भावानं विकत होते. माल येत नाही ताई घ्यायचं तर घ्या नाहीतर राहुदे अशा भाषेत सांगत होते. नाईलाज होता. शेवटी एका दुकानातून तांदूळ आणि मूगडाळ घेतली. बाकी काकडी, कांदा, टोमाटोसोबत इतर खायला घेतलं आणि निघाले. आयुष्यात पहिल्यांदा जेवण शिजवण्याचा प्रयत्न केला. आई-वडील सोबत नसताना फक्त मित्र-मैत्रिणी आणि ऑफिसरचे सहकाऱ्यांसोबत संपर्कात राहून फोनवरून विचारलं. आणि पहिल्यांदाच घाबरत इंडक्शनवर खिचडी केली. नशीबानं पहिलाच प्रयोग चांगला झाला.  हॉस्टेलवर राहिल्यानं याआधी कधीही जेवण करायची वेळ आली नव्हती. आज पहिल्यांदा ती वेळ आली.
अनेकांनी चिडवलं देखील या लॉकडाऊनमध्ये बघ जेवण शिकायची ही संधी आहे. म्हणजे लग्नानंतर तुला त्रास होणार नाही. पण लग्नासाठी नाही तर स्वत:ला जगण्यासाठी काही गोष्टी आल्याचं पाहिजेत हे मात्र खरं आहे. त्यातही पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानं आता थोडा धीर आला. त्यामुळे असे प्रयोग  आता पुढचे 21 दिवस करायला हरकत नाही हा विचार आला. या लॉकडाऊनमुळे का होईना पण काय आणि कशा समस्या येतील हे समजलं. प्रत्येक छोट्या गोष्टीचा विचार आधीच करायला हवा. बॅकअप हवा आणि आईची आठवण झाली.
बाकी अशा अनेक गोष्टी आणि अडचणी येतील आणि उरलेल्या दिवसांमध्ये  आणखीही बरंच काही शिकायला मिळेल. तुम्हीही विनाकारण बाहेर जाऊ नका आणि गेलात तर मास्क घाला आल्यावर स्वच्छतेची काळजी घ्या. घरी रहाल तर सुरक्षित रहाल.

रविवार, २७ जानेवारी, २०१९

एकच प्याला...

एकच प्याला...
राम गणेश गडकरींनी एकच प्याला हे नाटक मद्यपान आणि त्याचे दुष्परिणाम सांगणारं ज्वलंत विषयावर 1917 साली लिहिलं. राम गणेश गडकरींना महाराष्ट्राचे शेक्सपिअर असंही म्हटलं जातं. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी एकच प्याला हे नाटक आजही तितकच एव्हरग्रीन आहे.एकच प्याला हे पाच अंकी संगीत नाटक आहे.यात तळीराम हे मुख्य पात्र तर सुधाकर,सिंधू,रामलाल ही दुय्यम पात्रांची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. पहिल्या अंकात सुधाकर सिंधू आणि रामलाल यांच्यातला संवाद विलायतेला शिकायला जाणारा रामलाल व त्याच्या काळजीपोटी विचारपूस करणारी सिंधू, तर स्त्रीलाचं प्रियजनांची काळजी असते. तिच्या मनात नेमकं काय चालंलं आहे, हे कधीही न ओळखता येणारा असा संदेश देणारी सुधाकरची वाक्य.
      दुसऱ्या अंकापासून मूळ कथेला सुरुवात होते. मदिराधुंद अवस्थेत असणारा तळीराम आणि मदिरेचे तमाम फायदे.तळीरामची काही वाक्य तर आजच्या काळाशी इतकी तंतोतंत जुळणारी आहेत की कदाचित समाजातल वास्तव बदललंचं नसाव हा भास क्षणासाठी मानाला होऊन जातो. वास्तवदर्शी परिस्थितीला मार्मिक विनोदाची झालर घालून समाजातील घटना आणि वास्तव वारंवार आपल्यासमोर उभं राहातं. 'नशेबाज व्यक्ती कधी खोट बोलत नाहीत.त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही कारण त्यालाच काही समजत नसतं. चोरीच्या बाबतीत तो मूर्ख असतो.दारु प्यायला की गुलामाचा राजा होतो.' या सारखी वाक्य थोडा विचार केला तर आपल्याला आजच्या काळाशीही तितकीचं रिलेट करता येतात. तळीरामचं एकचं प्यालामधलं एक वाक्य तर खूप सुंदर आहे.'पूर्वी नाटकाचं चित्र वास्तरुपी संसारात दिसायचं, आता संसाराचं नाटकासारखे होत आहेत'. ''रंगभूमीच्या  आणखी प्रेक्षकांच्या मध्ये दिव्यांची एक धगधगीत अग्निरेषा असते. नाटयसृष्टीची ही मर्यादा ओलांडून प्रितीविवाह सत्यसृष्टीत उतरलाम्हणजे त्याचे पोरखेळ निम्मे दरानंसुध्दा पाहण्याच्या लायकीचे नसतात. लोक म्हणतातनाटक हे संसाराचं चित्र आहे. पण मी म्हणतो कीहल्ली संसार हे नाटकाचं चित्र बनत चाललं आहे! प्रितीविवाहाच्या पूर्वार्धाचा उत्तरार्धाशी काडीइतकाही संबंध नसतोकिंवा काडीइतकाच संबंध असतो. प्रितीविवाह हा द्वंद्वसमास असून वकिलामार्फत त्याचा विग्रह करून घ्यावा लागतो. लग्नाच्यापूर्वी प्रेमाची आषुकमाषुकं हातात हात घालून भटकण्यासाठी जी तळमळत असतातनुसती पायधूळ दृष्टीस पडण्यासाठी ज्या उत्कंठतेने एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसताततीच पुढं एकमेकांच्या डोळयात धूळ फेकण्यासाठी संधी पाहात असतात! चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडवणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहताच चावू की गिळूअसं करायला लागतात.''आजही ती तळीरामची वाक्य आठवून पाहिलं तरी समाजात घडणाऱ्या घटनांचा संदर्भ लागतो.म्हणजे लेखकाच्या प्रगल्भतेची वेळोवेळी जाणीव होते.
      नाटकाचं कथानक पाहायला गेलं तरी अगदी सरळ आहे 2 कुटुंब एक सुधाकर सिंधू आणि त्यांचं तान्हं बाळ आणि दुसरं तळीराम आणि त्याची पत्नी.तळीराम मदिरेत उन्मत्त होऊन बुडालेला स्वतंत्र माणूस, गंगा नवऱ्याला वास्तवाचं भान देणारी पण तितकीचं तोंडानं फटकळ एक सोशीक स्त्री.जिच्या घरी मदिरेमुळे सोन्याच्या लंकेच रामाच्या वनवासात रुपांतर झालं.घरी अठराविश्व दारिद्र हातावर पोट असणारी आणि नवऱ्यापायी कंटाळलेली मात्र तरीही नवऱ्याचं करणारी स्त्री.सुधाकर कचेरीत चांगल्या पदावर काम करणारा नोकरदार घरी गडगंज श्रीमंती पण स्वभावात मात्र अहंकार.सिंधू एक सोशीक पतीव्रता स्त्री. जी पतीच्या एका शब्दाबाहेरही न जाणारी, पतीच्या सेवेत आपली धन्यता आणि सुख माननारी सिंधू.जी पत्नी ताई आणि आई अशा तिनं भूमिका कोणतीही कसर न करता भरुन काढणारी असते.मात्र सुधाकराच्या एका निर्णयानं सिंधूची होणारी फरपट,तरीही पतीव्रता जपणारी अशी सोशीक सिंधू.आज आपल्या अवतीभवती अशी लोकं पाहायला मिळतात आणि त्यात तीळ मात्रही शंका नाही हे खरेचं!
      एकदा सुधाकराचा अपमान होतो.तो अपमान पचवण्यासाठी सुधाकर या एकच प्याल्याची मदत घेतो आणि ती मदत घेण्यासाठी तळीराम त्याला मदत करतो.तळीरामाच्या आग्रहापोटी तो एकचं प्याला घेतो. त्याच्या एकाच प्याल्यानं संमोह अवस्थेची सुरूवात होते.त्यानंतर वरचेवर मदिरा घेणं, आर्य मदिरा मंडळाच्या बैठकींना बसणं असा टप्पा वाढून तो उन्माद अवस्थेपर्यंत येतो.या उन्माद अवस्थेत सुधाकराला आपली चूक कळते आणि तो सिंधूची माफी मागून पुन्हा मदिरा न घेण्याचं वचन देतो.सुधाकराच्या मनावर ताबा असला तरी उन्माद अवस्थेत मात्र त्याच्या शरीरावर मात्र ताबा राहात नाही.त्यामुळे तो त्याची प्रतिज्ञा दारु पिऊन मोडतो.आणि पुन्हा सिंधूकडे पैसे मागायला येतो.दारुपायी सोन्याची लक्षी लकेत रुपांतर झालेली कष्ट करुन पैसै मिळवून स्वत:चं पोट भरणाऱ्या सिंधूकडे कुठे असणार पैसे.पण सुधाकराला परिस्थितीचं भानंच नाही तो मात्र प्रलयावस्थेत पोहचलेला असतो.दारुशिवाय त्याला दुसरं काही दिसत नाही.त्या दारुनं आपले प्राण जातील याचं भानही तो विसरतो.सिंधू पैसे देऊ शकत नाही त्यामुळे तीच्या बाळाला आणि सिंधूला सुधाकर काठीनं मारतो.आणि त्यातचं सिंधूचा मृत्यू होतो.शेवटी भानावर आलेल्या सुधाकराला आपली चूक कळते मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.तोही स्वत:चं जीवनं मदिरेत कापूराचं विष घालून आपलं जीवन संपवतो.
      दारु वाईट आहे की चांगली. हा प्रश्न कायमच अनुत्तरीत राहीलाय..काही जण स्टेटस म्हणून काहीजण निराशा संपवण्यासाठी काही जण सवय म्हणून तर काही जण आग्रहापोटी त्या मदिरेचा एकच भरलेला प्याला घेतात आणि त्या एका प्यालात उन्मत्त झालेल्या प्रलयकारी समुद्रासारख्या खवळत्या कडवटपणाला पचवण्यासाठी प्रत्येक रिकामा प्यालाला भरुन पेगवर पेगवर पेगवर पेग घटके मोजत घेतचं राहतात..हे समाजातील सगळ्यात मोठ दुर्दैवं आहे. या नाटकानंतर अनेक व्यसनमुक्ती केंद्र पथनाट्य सम्मोहन ह्यासारख्या अनेक गोष्टी शासनानं राबवल्या.मात्र आजही गावापासून शहरापर्यंत दारु घेऊन अनेक स्त्रीयांचा संसार आयुष्य कित्येक मुली तर बलात्काराच्या बळी बनल्या आबेत.आजही मदिरेत अखंड बुडालेल्या नवऱ्याचं अस्तित्व समाजात टिकण्यासाठी स्त्री जीव तोडून प्रयत्न करते.तळीरामच्या नाटकातील गंगेचं रुपही धारण कतरणाऱ्या स्त्रीया आहेतचं पण त्यांच्या हाती मात्र अपयश किंवा गरीबीच येते. आजही सिंधूसारख्या मुक गिळून गप्प बसणाऱ्या स्त्रीया पतीव्रता सोशीकता तशीच आहे. बदलला तो फक्त दृष्टीकोन, हेतू, आणि नावं मात्र आजही एकच प्याला तसाचं आहे कोणासाठी भरलेला तर कोणासाठी रिकामा...भरलेल्या प्याल्यानं सुधाकराचं आयुष्यात प्रलय आला.तर रिकाम्या प्याल्यानं सुधाकर आणि सिंधूचं आयुष्य रिकामं केलं.
  शेवटी काय मोह वाईट.मग तो कोणत्याही गोष्टीचा असो.खाण प्रेम पीण किंवा अजून काहीही म्हणूनच तर मनाला घोड्याची उपमा देतात..चौफेर मोहीत होणाऱ्या मनावर ताबा मिळवणं कठीणचं.अगदी शेवटी म्हणायचं तर याचं एकचं प्याला मधलं सुंदर वाक्य दारु एकदा प्यायली की सुटत नसते.ती सुटण्याची एकचं वेळ दारु प्यायच्या आधीची. मोहात पडण्याआधीच त्यावर कंट्रोल ठेवता आला तर उत्तम. किंबहूना त्यातचं आपलं भलं असतं शेवटी सगळ मृगजळचं म्हणा....फक्त आपण कोणत्याही मोहात न पडता आणि पडलातचं चर वेळीचं संमोह अवस्थेत सावरता येण महत्त्वाचं नाहीतर तोचं मोह आपला विनास करतो आणि म्हणूनचं एक श्लोक मला जाता जाता आठतो... विनाशकाले विपरीत बुद्धी....
   या प्रकल्पासाठी मी युट्यूवरील नाटक पाहिले.आणि गुगलवरील एकचं प्याला पुस्तकाची प्रत वाचली.
क्रांती रवींद्र कानेटकर


                                                                 

रविवार, ९ जुलै, २०१७

गुरूदक्षिणा...

  आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरूपौर्णिमा...गुरूपौर्णिमा हा गुरूपूजनाचा दिवस...यानिमित्तानं राज्याच्य विविध भागांमध्ये उत्सव सुरू आहे.गुरूला आपल्या जीवनाच्या जडण घडणीत अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या जीवनाला घडवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस...आई,शिक्षक,मित्रमैत्रीणी,ऑफिसचे सोबती बॉस आणि अर्थातच देव किंवा मठातील साधू हे तर प्रत्येकाच्या आयुष्यातले गुरू असतात. पण त्या व्यतिरीक्त आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या-छोट्या सजीव निर्जीव गोष्टी आहेत ज्या कळत नकळत गुरूंसारखचं आपल्याला सातत्यानं मार्गदर्शन करत राहतात...
      अनुभव हा माणसाचा सगळ्यात बलवत्तर आणि मोठा गुरू म्हणायला हरकत नाही. अनुभवातून आपण शिकतो दुसऱ्याला शिकवतो आणि घडत जातो. पण काही म्हणा...आपल्याला जितक्या उंचीवर हे अनुभव नेऊन ठेवतात त्या पेक्षा १० पट आपले पाय जमिनीवर आणण्याला जबाबदार हा आपलाचं अनुभव असतो,नाही का?
    निसर्ग...तुम्ही निसर्ग नियमाच्या विरूद्ध गेलात तर निसर्गही तुम्हाला त्या पद्धतीनं त्याचं रुप उलगडून दाखवत आणि या निसर्गाकडून ही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेतचं की ओ...फुलाकडून प्रसन्नता,ताजेपणा,हवे कडून भेदभाव न करण्याची दृष्टी,सागराची विशालता सामर्थ्य,रागात असणार रौद्र रूप,पक्षांची गगनभरारी आणि ऊन सावलीच्या खेळात रंगणारी लपाछपी. या सगळ्याच गोष्टी प्रत्येक लेखकाच्या फिलॉसॉफीत असतातचं की...आणि प्रत्यक्षातही..फक्त आपली अनुमान शक्ती आणि निरीक्षण क्षमता कमी पडते इतकचं...हे सगळचं खूप कॉमनं आहे पण तरी...
   आज गुरूपोर्णीमेच्या निमित्तनं आज मला स्वत:लाच एक छोटसं गिफ्ट घ्यावस वाटल का माहित आहे का..? आपण आपले सगळ्यात पहिले गुरू असतो असं मला वाटत...आरश्यासमोर एकदा स्वता: उभं राहूनं स्वता:ला आपण मार्गदर्शन करत असतो. आपल्या मनात आंतरंगात एक स्वता:चा अस्तीव टिकवण्यासाठी धडपड चालू असते. कुठेतरी आपणचं आपल्याला आतून सतत दिशा दाखवत असतो...मार्गदर्शन अर्थातच घोतो आपण... पण ते जे स्वत:चं वेगळेपण टिकवण्यासाठी आपण धडपडत असतो ना... नला असं वाटत की माझं अंतरमन हा माझा गुरू आहे...कारण प्रत्येक अडल्या प्रसंगावर डोळे बंद करून स्वता: च्या मनाला विचारते त्या अंतरमनाचा आवाज ऐकते..मला मिळणारं उत्तर आणि त्याचे रिझल्टल्स हे जवळपास सारखे असतात...उदा.मी एखादी गोष्ट करतेय आणि मला माहित आहे की ज्यामुळे आज मी माझ्या यशाची पहिली पायरी चढू शकले आणि ही खरी गुरूदक्षिणा आहे माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या गुरूंसाठी नाही का...?

शनिवार, २० मे, २०१७

संधी

      नुकतच कॉलेज संपलं.आता पुढे काय हा मोठा प्रश्नच होता.मास्टर्स करायच तर काय विचारता फी जास्त आणि जागा कमी अशी गत मुळी !विचार तर केला होता मास्टर्स चा फोर्म भरायचा पण आरक्षणाच्या गर्दीत जागा उरल्या तर अॅडमिशन मग त्यासोबत साईडबाय साईड सहज जॉबसाठी प्रयत्न करून बघूया अस सहज मनात आल व CV सगळीकडे द्यायला सुरूवात केली.कल्पना नसतानाही अचानक सगळीकडे CV शॉर्टलीस्ट झाला.मुलाखतीसाठी फोन आले.एक एक करत सगळीकडे मुलाखती दिल्या मात्र त्यानंतर कित्येक दिवस प्रतिसाद आलाच नाही.हताश आणि निराश झालेल्या मनात अनेक विचार येऊन गेले.मात्र आई आणि माझा मित्र प्रणित यांनी नेहेमी माझ्या मनात होप्स जागे ठेवण्याच काम कऴत न कळत केलं.
        "तू हुशार आहेस मेहेनती आहेस, तू करू सकतेस अगं! कुठेही नाही मिळाल आता तरी हार नको मानूस पुन्हा छान तयारी कर आणि तुला मिळेल अगं का इतक टोन्सन घेतेस !या वाक्यांनं थोडा धीर यायचा. एक दिवस असचं अचानकपणे एका दिवशी सलग काही मिनीटांच्या अंतराने तीन फोन आले.एक फोन साप्ताहिकातून एक वृत्तपत्रातून आणि एक चॅनल मधून! आता मोठा झोल होता कुठे जाऊ अस झाला होतं.साप्ताहिक आणि वृत्तपत्रात मी या पूर्वी कोणतेच काम केले नसल्याने तिथं कितपत जमेल आणि त्या वातावरणात आपण सर्वाइव करू शकू का याचा विचार करून थोडी ती संधी होल्डवर टाकली आणि चॅनलला जायच अस ठरलं.अजून 5 राऊंड बाकी होते.वृत्तपत्रचे सगळे राऊंड देऊन सिलेक्शन झाल होतं.पण चॅमलच्या प्रत्येक राऊंड नंतर एक वेगळीच भीती होती.
         मात्र  अचानक शेवटचा राऊंड संपल्यावर हातात लेटर मिळालं.आणि पुन्हा ती वाक्य आठवली.या आधी मी केलेल्या अभ्यासाचा आणि एंटर्नशीपच फळच असाव हे.आता मन लावून फक्त काम करायचं खूप शिकायच आणि मी माझ्या इंटरव्ह्यु मध्ये दिलेल्या उत्तराला प्रत्यक्षात साकार कारायच ही इच्छा बाळगून कामाला नव्यान सुरुवात झाली.इथले सगळेच सर आणि मॅम खूप छान समजून घेतात,शिकवतात,ओरडले तरी समजूून सांगतात.इथलं वातावरण खेळीमेळीच आहेच पण तिकतच जबाबदारीचही आहे.त्यामुळे माझी सुरूवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नाही.
विशेष वाटत ते एका गोष्टीच देेव देतो ते भरभरून तस मला संधी आली तेव्हा निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं.ही माझ्या यशाची पहिली पायरी आहे.

सोमवार, ८ मे, २०१७

बाहुबली 2


बाहुबली 2 हा चित्रपट पाहायचा हे अचानकच ठरलं.कोणत्याही वृत्तपत्राचा किंवा दुरचित्रवाणीवरचे चित्रपटबद्दलचे परीक्षण समीक्षण तथाकथित मते मी या आधी वाचलेली नाहीत.त्यामुळे मी ह्या चित्रपटाबद्दल जे मला वाटलं त्यात कोणताही पूर्वग्रहाचा समावेश नसावा कारण हा चित्रपट पाहायचा की नाही हे फार विचार केलेले नव्हते, मात्र येणाऱ्या जोक्स आणि मेसेजमूळे अर्थात त्याची महात्वाकांश आणि उत्सुकता वाढली आणि म्हणून तो चित्रपट पाहून त्यावर आज काहीतरी लिहावेसे वाटले ते यासाठीच.
   एका बाजूला राजाची कर्तव्य तत्व आणि दुसऱ्या बाजूला धर्म आणि वचनाचे पालन या दोन गोष्टीत सांभाळून आणि समजून त्या अमलात आणणे.एक उत्तम राजाचे वैशिष्ट्य कर्तव्य आणि प्रजेप्रति असणारी आस्था आदर आणि त्यांचे रक्षण करणे माता आणि मातृभूमी (अर्थात प्रजा आणि राज्य)यांचा सन्मान आणि पालन याचे उत्तम धडे देणारी राजमाता आणि तिचा पुत्र बाहुबली अशी उत्तम कथा गुंफली आहे.चित्रपटात प्रेम कथा आणि शेवटी नेहेमी हेरॉचा विजय हे ठरलेले गणित असतेच.पण त्या पलीकडे जाऊन विचार केला तर या चित्रपटातील अनेक गोष्टी आजच्या काळाशी संलग्न होताना जणवतातच की! परायोसे ज्यादा अपनोंके घाव चुंबते है त्या type मध्ये अंतर्गत असणार राजकारण आणि त्यात जाणारा सत्याचा बळी आणि इतकं सगळं घडून शेवटी वाईट प्रवृत्तीच्या पापाचा घडा भरला की त्याचा नाश होतोच.अशी एकूणच एका वाक्यात सांगून जाणारी कथा मात्र त्यात रंगवलेली पात्र आणि सेट हा काल्पनिक असला तरी त्यातील असणाऱ्या स्वभावाच्या प्रवृत्ती या आजही पाहायला मिळतात.
   या पलीकडे सिनेमॅटोग्राफी आणि ग्राफिक्स चा उत्तम वापर केला आहे.या चित्रपटात उभे केलेले सेट आणि काही दृश्या ही स्वप्नवत वाटणारी असली तरीही ती काही क्षण खरी भासून जातात मनाला भुरळ पडतात. प्रेमकथा आणि त्यात येणारे अडथळे त्यावर घेतलेला निर्णय हा किती योग्य आहे हे पटवून देणारे डायलॉग्स!
     गाणी आणि संगीतही कुठेच फारसे रटाळ वाटले नाही.खर या सिनेमाचे बिग बजेट का आहे ते सिनेमा पाहिल्यानंतर जाणवते.कुठेच राटाळपणा वाटला नाही.इंटरवल पर्यंत उत्सुकता कायम राहते.बाकी चित्रपट जरूर पहा कारण कटप्पाने बहुबलीला का मारले यासाठी नाही तर एका चुकीच्या निर्णयात किती ताकद असते हे अजमावण्यासाठी.एका गैरसमजातून किती राजकारण केल जात आणि अर्थातच या बिग बजेट चा एक भाग म्हणून त्यातील स्वप्नवत सेट आणि दृश्य पाहण्यासाठी.
-क्रांती
   

शनिवार, १ एप्रिल, २०१७

अभ्यासाचे तंत्र

अभ्यास करायचा म्हटलं की सगळ्याच्या डोक्याला आठया पडतात.अभ्यास म्हटलं की पोटात गोळा येतो आणि परीक्षेच्या वेळी मात्र कधीही न बोलणाऱ्या किंवा आपण ज्यांच्यावर सतत जळत असतो त्या आपल्याच वर्गातल्या मित्र मैत्रिणींची मदत कशी घ्याची आणि मग त्यासाठी वापरले जाणारे फंडे आठवतात.अभ्यास म्हटलं की येत ते टेंशन आणि नको वाटत त्या परीक्षा;त्याच अभ्यासासाठी काही सोपे आणि मजेशीर फंडे आज मी सांगणार आहे. हे  सगळे फंडे मी स्वतः माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या वेळी वापरलेले आहेत. फक्त एक आहे या सगळया फंडयांचा वापर केला तर फायदा नक्की होतो मात्र त्यासाठी नियमित काम करायला हवं आणि थोडा वेळ हि द्यायला हवा.
फंडा 1
SQ4R study
S -survey
Q- questions
R -read
R -react
R -remind
R -rewrite
याशिवाय
पॉकेट डिक्शनरी ज्यात आपण वेगवेगळ्या चिन्हाचा वापर करून किंवा आकृत्यांचा वापर करून उत्तर शॉर्ट मध्ये लिहून ठेवावं.उदा ट्री डायग्राम चा किंवा वेगवेगळ्या डायग्राम चा वापर करावा.या शिवाय आपण जे वाचतो त्याची नोंद कुठेतरी संदर्भासाठी करून ठेवावी.शक्य तेवढे पुन्हा पुन्हा आठवून लिहून काढण्याचा प्रयत्न करावा.फॉर्मुले किंवा समीकरण लक्षात ठेवण्यासाठी वेग वेगळी वाक्य कविता तयार कराव्यात.कोडी खेळ तयार करावेत ज्यामुळे ते सहज लक्षात राहतील.या शिवाय वर्गात शिकवल्या जाणाऱ्या लेक्चर च्या रनिंग नोट्स काढाव्यात.या शिवाय शक्य असल्यास ग्रुप स्टडी करावा त्या मध्ये एखाद्या विषयाला धरून चर्चा केली जावी त्याच बरोबर जो विषय कळला नाही तो ग्रुप मधल्या एकां समजावून द्यावा त्यावर प्रश्न आणि उताराच्या चर्चा कराव्यात जास्त उदा वापर करून ती चर्चा मुद्याला धरून असावी त्यातील महत्वाच्या नोट्स काढाव्यात. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा केलेला भाग वाचाव व दिवसातून कमीत कमी 3 वेळा तो आठवतो का याचा प्रयत्न करावा. शक्यतो शांततेच्या वेळेत व फ्रेश असताना वाचन करावे. सकाळी किंवा एकदम रात्री आणि बाकी वेळी त्यावर विवेचन चर्चा रिमाईंड लेखन याचा वापर करावा.
सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेछा ...

गुरुवार, ३० मार्च, २०१७

ड्रोन पत्रकारिता

डायरी, टेप रेकॉर्डर, कॅमेरा अशा गोष्टींचा समावेश या आधी पत्रकारितेत पाहायला मिळाला. मात्र या पारंपरिक प्रतिमे नजिकच्या वर्षात अनेक बदल घडलेत. इलेट्रॉनिक मीडियामध्ये ओबी, लाईव्ह यू सारख्या गोष्टींनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला समावेश करून घेतला. सध्याच्या पत्रकारितेमध्ये मोबाईल आणि ड्रोनने आपलं प्रभूत्व प्रस्तापित केलं असं म्हणनं वावगं ठरणार नाही.
    मुळात ड्रोन पत्रकारितेमधला ड्रोन हा आहे तरी काय? तर ड्रोन हा एक असा कॅमेरा आहे जो रिमोटच्या सहाय्यानं हवेत उडत असतो. हे एक छोटसं गॅजेट असतं जे विमानासारखं आकाशात उडतं आणि पत्रकारितेमध्ये महत्त्वाचे जे व्हिजुअल्स असतात. त्या व्हिजुअल्सचे एरिअल शॉटच्या म्हणजेच उंचावरून शॉट्स घेण्याचे काम ड्रोन कॅमेरा करत असतो.

 महाराष्ट्रात ड्रोनचा सर्वाधिक उपयोग हा मराठा मूक मोर्चाच्या वेळी झाला. राज्यात ठिक-ठिकाणी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा मकू मोर्चा काढण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने जमा झालेल्या लोकांचे दृश्यं टिपण्यासाठी या ड्रोन कॅमेऱ्याचा मोलाचा वाटा होता.
      सध्या तरी ड्रोनचा वापर अशाच काही प्रसंगाच्या वेळी होतो. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईत काही काळासाठी ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र कोणता उत्सव असो किंवा अशा जागी जिथे सहज जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोनच्या आधारे व्हिजवल्स घेता येऊ शकतात आणि आता मोबाईलद्वारे जशी पत्रकारिता होते तशीच भविष्यात ड्रोनमुळे पत्रकारिता करता येईल.

बुधवार, २९ मार्च, २०१७

नटापासून अभिनेत्यापर्यंत...

(काल आमच्या भेटीचा पहिल्यांदाच योग आला.ज्यांना आपण गेले काही दिवस मालिकांमधून आणि या आधी सिनेमा व अभिजात नाटकाच्या माध्यमातून पाहात होते त्यांना आज भेटायची संधी मिळाली.का कोण जाणे पण आता पर्यंत अनेक व्यक्तींना कलाकारांना भेटण्याचा योग्य आला, पण यांच्याशी भेटून गप्पा रंगण्यात जी मजा होती ती काही वेगळीच होती.ज्याला आपण म्हणतॊ ना, नजर आकाशात आणि पाय जमिनीवर अगदी तसाच व्यक्तिमत्व असणारा हा कलाकार! अगदी नटा पासून अभिनेत्यापर्यंत विविध भूमिका साकारणारे श्रीराम कोल्हाटकर.)
    माझ्या एकूणच कारकिर्दीला सुरुवात ही शालेय जीवनापासून झाली.प्रेक्षकांमध्ये नुसत बसून राहण्यापेक्षा नेहेमी समोर जे चालू आहे त्या गोष्टीचा एक आपण भाग व्हावं, हि ईर्षा काही स्वस्त बसू देईना आणि मग राज्यनाट्य स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा तिथून जी सुरुवात झाली ती अगदी महाविद्यालायपासून ते आतापर्यंत.मला सुरुवातीला कॅरेमऱ्याची खूप आवड होती आणि त्यातही नवीन काहीतरी करायची मग मी वेग वेगळे शो करायचो. कॅमेऱ्यातील सगळं तंत्र शिकून घेतलं,पण नंतर काही कारणाने या सगळ्या माझ्या क्रिएटीव्हीटीवर पाणी पसरलं.त्याला काही पर्सनल कारणही तिकीच जबाबदार होती.पण मला याच क्षेत्रात स्वतःच एक स्थान निर्माण करायचा होत आणि त्या जोडीला पोटापाण्यासाठी पैसे कामावनाही गरजेचं होतं.घरच्यांची म्हणावी तितकी साथ नसल्यानं आता पुढची वाटचाल एकट्यानं कारण भाग होत.पुढे मला दिलीपच्या ओळखीने एका नाटकासाठी छोटा रोल मिळाला. तो रोल छोटा होत्या त्यापेक्षा जास्त त्या नाटकात मला विक्रम गोखलेंसोबत काम करायला मिळणार याचा आनंद जास्त होता.त्या एका नातकातच आमची ओळख खूप चांगली झाली आणि त्या नंतरची बरीच नाटके हि मला त्यांच्यासोबत करायला मिळाली हे माझं भाग्य होतं.मी सिरीयल केल्या चित्रपट केले पण आजही मला ती अभिजात नाटक जास्त भावतात आवडतात, त्यात जास्त काम करायला आवडत.कसा असत ना तुम्ही सिनेमा करा किंवा सेरीयल आपण त्या चॅनेल च्या हातातले भावले असतो पण नटाला मात्र नाटकातील पात्रच आणि कथेला अनुसरून अभिनय करण्याची मुभा असते.तुम्ही खूप पात्र जगता फुलवता आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच एक वेगळे पण निर्माण करता.याच उदा द्यायचं तर विक्रम गोखलेंच बॅरीस्टर नाटक त्यात त्यांनी जी भूमिका रंगवलीय ती आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते.
एकूणच साध्याच एकंदर हे पाहता सगळंच कुठेतरी मागे पडतंय असं वाटत आहे.आजही माझ्या घरी TV  नाही कारण आज आपल्याला विचार करायलाच नको आहे,फक्त त्या खोक्या समोर बसून स्वतःच मनोरंजन करायचं बिनबोभाट ; त्या पलीकडे आज मुलांना वाचायला आवडत नाही. चांगल्या गोष्टी या तेवढ्या पुरत्याच राहतात, खर तर मला तुमच्यासारख्या नव तरुणांशी मैत्री करायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं त्यांच्यात काहीतरी करण्याची धमक असते ताकद असते ऊर्जा असते आणि तीच मलाही मिळत असते.फक्त दुःख याच वाट की त्यांना सगळ्या गोष्टी झटपट हव्या असतात माहिती नुसती नको असते वाचन नको असत पण तेच विझुवल गोष्टी खूप पटकन एक्ससेप्ट करता.याला कारण ही जनरेशम गॅपच आहे. पण तितकीच उत्तम विचार आणि नवनिर्मितीची ताकद आहे.फक्त याला चांगल्या वाचनाची योग्य जोड द्यावी आणि जास्त आव्हानात्मकपणे सद्याच्या गोष्टी मांडल्या जाव्यात; त्याची सुरुवात झाली आहे असा म्हणायला हरकत नाही.
शब्दांकन - क्रांती कानेटकर

भर उन्हात काम...मगार

मेगाब्लॉक, जम्बोब्लॉक कशासाठी? कोणासाठी?
'रोड मरे त्याला कोण रडे' असं म्हणत आपण नेहमीच रेल्वे प्रशासनाला आणि सेवेला नाव ठेवत असतो. दर रविवारी मेगाब्लॉक घेऊन लोकल उशिरा होतात कश्या? लोकल रुळावरून घसरतेच कशी? असा प्रश्न देखील आपण वारंवार करतो. मात्र खाली दिलेल्या या छायाचित्राकडे जरा पाहा...

प्रत्येक रविवारी हे रेल्वे कामगार भर उन्हात काम करत असतात. भर उन्हात फक्त हेच कामगार काम करतात असं मुळीच नाही. मात्र रेल्वे सेवा सुरळीत रहावी. प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं यासाठी हे रेल्वे कामगार काम करत असतात.
      आता राहिला प्रश्न होता रेल्वेच्या सेवेचा. बऱ्याचदा लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला पहिलं प्राधान्य दिल्यामुळे रेल्वे उशिरानं धावतात. तर काही वेळा क्रॉसिंग करताना रेल्वे रुळावरून डब्बे घसरतात. दोन्ही रेल्वे रुळांमधील क्रॉसिंग करतानाचे अंतर आणि दिवसा उष्ण आणि रात्री दमट तापमानामुळे रेल्वे रुळ हे आकुंचन पावतात. त्यामुळे रेल्वे रुळाला तडे जातात. अशा अनेक कारणांमुळे मध्य असो अथवा पश्चिम किंवा हार्बर मार्गावर रेल्वे सेवा उशिरानं असतात.
     प्लॅटफॉर्मवर लोकल उशिरा येत असल्याचं कळताच ही लोक दर रविवारी कसलं काम करतात, असा चिडखोर प्रश्न स्वत:लाच विचारतो. पण मुळात आपण जो काही प्रवास करतो तो याच रेल्वे कामगारांमुळे करतो. मग दोष तरी कुणाचा? तर दोष आहे तो त्या बड्या अधिकाऱ्यांचा जो लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेसला आधी हिरवा सिंग्नल देतात आणि नंतर मुंबईकरांना. मेगाब्लॉकच्या दिवशी हा कामगार योग्य ते काम करतो. मात्र मेहनत घेऊनही आपण या रेल्वेसेवेची धुरा असणाऱ्या अधिकाऱ्याला दोष न देता या रेल्वे कामगाराला देतो.

बाळकडू

      मुंबई... स्वांतत्र्यानंतर या मुंबईवर अनेकांनी आपला हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला. मुंबई सोन्याचं अंड देणारी मुंबई! कधी ही न थांबणारी मुंबई! मात्र इथेच जन्मलेल्या मराठी माणसाला या मुंबईतून बाहेर काढण्याचा प्रयत्न अनेक वेळा झाला. इथे राहणाऱ्या भूमिपुत्रावर होणारा अन्याय हा दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी सर्व सामन्यांचे डोळे उघडण्या आधीच पाहिला होता. या मराठी माणसासाठी... मराठी अस्मितेसाठी 1965मध्ये उभी राहिली ती शिवसेना.
  पण मुद्दा हा एका राजकीय पक्षाचा नाही आहे... मुद्दा आहे तो बाळासाहेबांनी ओळखलेल्या आणि लक्षात आलेल्या मराठीच्या अस्थित्वाचा आहे.
    वादाची गोष्ट म्हणजे मराठी माणसाचे मुंबईमध्ये असलेलं अस्तित्व, पहिल्यासारखचं आहे का? प्रश्न आहे मराठीचा, मराठी माणसाचा, मराठी अस्मितेचा. गेले कित्येत वर्षांपासून मराठी माणूस हा मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे. जागेच्या अभावामुळे, आर्थिक परिस्थितीमुळे, तर कधी येणा-या लोंढ्यांमुळे मराठी माणूस हा बाहेरचं फेकला गेला आहे.
    पण मराठी माणूस का फेकला गेला? तर खरं येथे असणाऱ्या गिरण्या-मिल्समालकांच्या कारस्थानावरून हथबल होऊन संप करून मराठी माणूस खचत चालेला. मोडेन पण वाकणार नाही, ही तर सुरूवात होती. पोटा-पाण्यासाठी आणि बायका-पोरांसाठी मुंबईत राहणारा मराठी माणूस हा आपले घरदार विकून नाईलाजाने मुंबईच्या बाहेर जात होता.
   कालांतराने इथल्या जागा गुजरात्यांनी, पंजाब्यांनी, मारवाड्यांनी बळकावल्या. मद्रासांनी हॉटेलस् काढले. तर गुजरात्यांनी शेअरबाजारात जोर धरला होता. प्रत्येकाने आपआपले उद्धोग चालू केले. आणि मराठी माणूस त्यांच्या हाताखाली काम करू लागला. आपल्याचं मातीतं दुसरा येऊन एखादा उद्दोग सुरू करतो आणि भूमिपूत्र त्याच्या हाताखाली काम करतो ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते. खर तरं आपल्या मराठी माणसाचे चुकले होते. आहे! त्याला उद्योग करता आला नाही. म्हणून तो चाकरमानीचं राहिला.
     बाळासाहेबांनी ह्या माणसाला झोपेतून जागं केलं आणि बाळकडू नावाचे शस्त्र दिले. तरीही मला असे का वाटे की, मराठी माणूस अजून झोपून आहे. येथील सत्ताधारी आपला कितपतं विचार करतात. ह्यांना आपण मतदान करून जिंकूण देतो का परप्रांतीय. असो!!



     आपले मराठी मुल देखील शिकले आहे. आपल्याकडे साहित्य आहे. शिक्षण आहे. आपण पण कशात कमी नाही आहोत. आता गरज आहे ती पुन्हा उभ राहण्याची, शिक्षणाच्या जोरावर प्रभूत्व मिळवणयाची. कोणासाठी तर... मराठी माणसासाठी.

मंगळवार, २८ मार्च, २०१७

शेतकरी असणं गुन्हा आहे का?

   सुका दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपीट अशा अनेक प्रसंगाना सामोरा जाणारा शेतकरी. आपल्या मेहनतीतून घामातून लोकांसाठी पिक पिकवणाऱ्या या शेतकऱ्याच्या वाटेला नेहमी संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष का असतो? वर्षभरात कमवलेले, कर्ज काढलेले पैसे शेतीसाठी वापरूनही शेतकऱ्याच्या हाती 50 टक्केही पिक हाती लागत नाही. अशातच शेतकरी आपला उदरनिर्वाह कसा करतो? त्याच्या कुटुंबाचं होत काय? एवढेचं प्रश्न आपण विचारतो.
    गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यानं आधी आसमानी आणि मग सुलतानी संकटांना तोंड दिलं. सुरु असलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक भाजप सरकारच्या हात धुवून मागे लागलेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्जासाठी तरतूद करतं, पण कर्जमाफी करत नाही.
|| एक दिवस सर्व किंमती वस्तू घराबाहेर ठेवून पाहा ||
|| शेतकरी काय असतो समजे ||
   
शेतकरी वर्षभर आपल्या शेतात सोनं पिकवत असतो. राखण करतो. स्वत:च्या काळजावर दगड ठेवून उभ्या पिकाचं रक्षण करतो. काही वेळेला गारपीट, दुष्काळ आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल होतो. तर काही वेळेला हाती पिक असूनही योग्य हमी भाव न मिळाल्यानं नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो.
     शेतकऱ्याला कुटुंबं नाही का? त्याला त्याचा संसार नाही का? खरचं शेतकरी असणं गुन्हा आहे का? जर शेतकरीच संपावर गेले तर त्यांच्या अन्न धान्यांवर जगणारे. काय होईल आपलं?

शनिवार, ११ मार्च, २०१७

छंदोत्सव.


छंदोत्सव..
"छंद आहे तिथे आनंद, व्यासंग तिथे परमानंद".

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghyo5CwWpzj2NTDzpov5auWsypR3QsSOjeVSGaSH90tjje52bplmfsbJAs6QkEYjhQaM-wgiEoek-_SkEjW8DP4ZzqjrQAXxbomFCw7upx5Ml5Q8xqnQ9U6q-7PADwEyBs3WxmTkqTSR6f/s320/20170311_161525.jpg
      किती सुंदर ओळी आहेत या ओळी. नुकतीच छबिलदासच्या गल्लीतून जाताना नजर त्या छंदोत्सव नावाच्या बॅनरवर पडली. कुतूहल म्हणून का असेना एक क्षण काय असेल, म्हणून आत जाऊन पाहावं असं वाटलं. सार्वजनिक वाचनालयाच्या पहिल्या मजल्यावर हे प्रदर्शन आहे हे वाचल्याक्षणी मी तिथे गेले. प्रदर्शन फार भव्य दिव्य नव्हतं, किंवा प्रदर्शनात विकण्यासाठी वस्तूही फारश्या नव्हत्या. होती ती फक्त कला आणि तिथे भेटला तो सच्च कलाकार...
        तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते. सुरुवातीला अगदी लोकरीच्या विविध विणलेल्या वस्तू, माग हॅन्ड क्राफ्ट, पेंटिंग्स, क्विलिंगपासून बनवलेल्या नानाविध वस्तू, कागदापासून आणि टाकाऊ पासून टिकाऊ तयार केल्याजाणाऱ्या वस्तू, इतकंच काय तर अहो! आपल्याला एक छंद असतोच की, बस आणि ट्रेनची तिकीटं जपून ठेवायचा तेही होता बरं का! विविध राज्यामध्ये आणि विविध वयोगटातील व्यक्तीसाठी असणारी वेगवेगळ्या काळातली तिकीटं तिथे होती. हे कमी म्हणून की काय आतपर्यंत येऊन गेलेल्या काडेपेट्यांचे बॉक्स आणि त्यावरचे चिन्ह हा हि छंदाचा विषय असू शकतो, हे त्या निमित्ताने पाहायला मिळालं!
      मला संपूर्ण प्रदर्शनात आवडलेल्या 2 स्टॉलवर मी जरा जास्त बोलेन.एक गृहस्थ आहेत जे आवड म्हणून नारळाच्या आणि शाहळ्याच्या करवंटीपासून विविध आकार आणि वस्तू तयार करतात.तर गोगटे नावाचे दुसरे गृहस्थ आहेत जे स्वतः करवंटीपासून विविध कलाकृती तयार करून त्याचा व्यवसाय करतात.या दोघांचेही स्टॉल समोरसमोर होते फरक हा होता एकाची आवड होती जी कलेतून सादर केली आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचावी यासाठी त्याचं शिक्षण ते देत होते, तर दुसरे गृहस्थ त्याच करवंटीचा वापर करून किचन, छोटा दिवा, समई यांसारख्या गोष्टी विकण्यासाठी तयार करत होते. अजून एक वेगळा स्टॉल पाहायला मिळाला तो म्हणजे पत्त्यांचा...पत्ते म्हणजे जुगार! असं जरी समजलं जात असलं तरी विविध ठिकाणी कोणकोणत्या आणि किती प्रकारचे पत्ते वापरले जातात, याचं उत्तम उदाहरण सांगायचं तर मांजरीच्या वेगवेगळ्या जातीचं महत्व सांगणारे पत्ते,विविध आकारातील पत्ते, इतकाच काय तर A4 साईझपेक्षा थोडे कमी आकाराचे पत्तेही तिथे होते, जे भारतात छापले जातात आणि अमेरिकेत मोठया प्रमाणात विकले जातात.
      अजून एक स्टॉल होता तो शिक्के आणि नोटांचा जो मला वेगळा वाटला; पराग रेडकर नावाचे उत्तम जाण असणारे गृहस्थ. जगभरातील विविध नाणीं आणि शिक्के फक्त छंद आहे म्हणून जमवणे. हा छंद असला ; तरी त्या मागचा इतिहास आणि प्रत्येक नाण्या आणि शिक्यामगचा असणारा इतिहास त्यांचं रहस्य, त्यातली गंमत याचा अभ्यास प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ते येणाऱ्या व्यक्तीला सांगत होते. एकूणच प्रदर्शनात मला आवडलेला भाग हा शेवटचा होता कारण नुसती छंद म्हणून नाणी जमवणे खूप सोप आहे. पण त्या मागचा इतिहास आणि अर्थशास्त्र अभ्यासपूर्वक सांगणं कठीण आहे.खूप गर्दी असल्यानं आणि आणि वेळेअभावी मला त्यांची मुलाखत घेता अली नाही पण त्यांच्या ह्या अनमोल छंदाला मात्र दाद द्यावीशी वाटली.आजचा दिवस आणि तो एक तास सार्थकी लागला असे छंद आपणही जोपासायला हवेत असा एक मनात विचार ही काही क्षणांसाठी येऊन गेला.शेवटी म्हणतात ना भाव तेचि देव आणि कला तिथे भाव याचा प्रत्यय मात्र आज यानिमित्तानं का होईना आला.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg6cBJ8kSxduUca0JoliJomDf4U-n9qSpktKhWUzXPxQhYKrVvw2-gr2Cqj9KG3gJHHVws0m_Q-aOozmUhT5x47CK3fqxz2geukUTQ7k23B6zsehyux_S094k8_hIXo2rS8YSq38BopRqC5/s640/20170311_161742.jpg